आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरही बनला ‘अविवाहित’ बाप, सरोगसीच्या माध्यमांतून दिला जुळ्यांना जन्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने  सरोगसीच्या मदतीने जुळ्यांना जन्म दिला आहे. त्याला  एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळे झाले आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी करणने अनेकदा वडील होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्याचे गुपित आता समोर आले आहे.   

करणने आपल्या मुलीचे ‘रुही’ तर मुलाचे ‘यश’ असे नामकरण केले आहे. करणचे वडील आणि दिवंगत निर्माते यश जोहर यांच्या नावावरून यश, तर आई हिरू जोहर यांच्या नावातील अक्षरांवरून रुही हे नाव ठेवण्यात आले आहे.   अंधेरी भागातील मसरानी रुग्णालयात ७ फेब्रुवारी रोजीच या जुळ्यांचा जन्म झाला. मात्र, महिन्याभरापासून जोहर कुटुंबाने ही गोष्ट लपवून ठेवली होती. वडील म्हणून करणच्या नावाची नोंदणी करण्यात आली असून आईच्या नावाचा उल्लेख मात्र नाही.  करण जोहरने यापूर्वी अनेकदा वडील होण्याची इच्छा बोलून दाखवली  होती. देशात २००२ पासून सरोगसी कायदेशीर आहे. मात्र, आई किंवा वडील यांपैकी एक जण दाता असणे बंधनकारक आहे.   
 
वडिलांच्या नावावरून ठेवले मुलाचे नाव
करणने मुलाचे नाव आपल्या वडिलांच्या नावावरून म्हणजे 'यश' ठेवले असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र तशी नोंद अद्याप बीएमसीकडे झालेली नाही. केवळ पालकाच्या नावात वडील म्हणून करन जोहरचे नाव आहे, तर आईच्या नावाचा रकाना रिकामा आहे. दरम्यान याच हॉस्पिटलमध्ये शाहरूख खानच्या तिसऱ्या मुलाचा म्हणजे अबरामचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला होता. 
 
बॉलीवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव   
करण जोहरने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्यांना जन्म दिल्याची बातमी समजल्यानंतर त्याच्यावर बॉलीवूडकरांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा, अालिया भट, फराह खान, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, रितेश देशमुख यांच्यासह अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
तुषार कपूरही बनला सिंगल डॅड 
- तुषार कपूरही गेल्या वर्षी सिंगल डॅड बनला होता. सिंगल पॅरेंट बनण्यासाठी त्याने सरोगसीची मदत घेतली होती. 
- त्याने मुलाचे नाव लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्यचा जन्म जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये झाला. 
- तुषारने सांगितले होते की, लक्ष्यचा पिता बनून मी खूप आनंदी आहे. तो आता माझ्या जीवनात खूप आनंद भरणार आहे. देवाची कृपा आणि डॉक्टरांच्या टीमच्या मदतीने आता सिंगल लोकही पॅरेंट बनू शकतात. 
- जितेंद्र आणि शोभा कपूर यांनी म्हटले होते की, ते आजोबा आजी बनून खूप आनंदी आहेत. तुषारच्या या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. निश्चितपणे हा देवाचा आशिर्वाद आहे. 
 
पुढे वाचा, करणने व्यक्त केली होती पिता बनण्याची इच्छा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...