आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण म्हणाला- पाक कलाकार घेणार नाही, संजय मांजरेकर म्हणाला- MNS होणार 0 MLA पार्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान याची भूमिका असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाला होणारा विरोध लक्षात घेऊन निर्माते करण जोहर यांनी आपणही देशप्रेमीच असल्याचे म्हटले आहे.
२८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून मनसेने याला तीव्र विरोध केला आहे. यावर जोहर यांनी म्हटले आहे की, मनसेच्या भावनेचा मी आदर करतो. भविष्यात माझ्या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार घेणार नाही. करणने एका व्हिडिओद्वारे त्याचे मत मांडले आहे. चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी दोन्ही देशांत शांततेचे वातावरण होते. त्यामुळे त्यावेळी असा विचार केला नव्हता असे करणने म्हटले आहे.
क्रिकेटक संजय मांंजरेकर याची मनसेला
या वादात क्रिकेटर संजय मांजरेकरने उडी घेतली आहे. त्याने मनसेला मनसेच्या भाषेत उत्तर दिले आहे. मनसे केवळ एक आमदार असलेली पार्टी आहे. कायम धमक्या, मारहाण, लुटालुट. अनुभवातूनही हा पक्ष काही शिकला नाही. येत्या निवडणुकीत या पक्षाला शुन्य जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही.
संजय मांजरेकरचे ट्विट जसेच्या तसे
One MLA party, MNS, not learning their lessons. With threats of vandalism etc they are certain to be a zero MLA party next elections.
पुढील स्लाइडवर पाहा, करण जोहरचा व्हिडीओ... दिग्दर्शक भेटले मुंबई पोलिस आयुक्तांना...
बातम्या आणखी आहेत...