आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाबच्या ‘भुताने’ झपाटलेल्या अबू जुंदालची सायकियाट्रिक चाचणी होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कसाबच्या ‘भुताने’ झपाटलेल्या जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याची सायकियाट्रिक चाचणी होणार आहे. 15 मार्चपूर्वी याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने आर्थर रोड तुरुंगाच्या अधीक्षकांना दिले आहेत.

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी जबी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. फासावर लटकावण्याआधी कसाबला ठेवण्यात आलेल्या विशेष सेलमध्येच त्याला ठेवण्यात आले आहे. जबीने न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात कसाब स्वप्नात येऊन आपल्याला त्रास देतो. त्यामुळे आपली झोप उडाली असल्याचे जबीने म्हटले आहे.

सौदी अरेबियातून ताब्यात घेतल्यापासून आपली मानसिक स्थिती बरी नाही. तिहार तुरुंगात उपचार सुरू होते. आता मुंबईत कसाब स्वप्नात येत असल्याचे जबीचे म्हणणे आहे. न्यायालयाने जबीचे म्हणणे गांभीर्याने घेतले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे चौकशी तुरुंगातच करण्यात येणार असून मोक्का न्यायालयात त्याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

मुंबई हल्ला व औरंगाबाद शस्त्र प्रकरणात जबी अटकेत
सय्यद जबिउद्दीन ऊर्फ अबू जिंदालला मुंबई हल्ला व औरंगाबाद शस्त्र प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्यात आले असून सुनावणी सुरू आहे.