आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kasara Local News In Marathi, Mumbai Local Accident

कसारा लोकलचे डबे घसरल्याने एका प्रवाशाचा मृत्यू, सहा जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- मुंबई येथून कसारा येथे जात असलेल्या लोकलचे डबे आज (गुरुवार) दुपारी आंबिवली ते टिटवाळा या दरम्यान घसरल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून सहा जखमी झाले. जखमींमध्ये लोकलच्या गार्डचाही समावेश आहे. या अपघातामुळे काही गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला असून काही रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईकडे येणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्या मनमाड येथून पुण्याजवळ असलेल्या दौंड रेल्वेस्थानकामार्गे वळवण्यात आल्या आहेत. मुंबईहून मनमाडकडे येणारी गोदावरी एक्स्प्रेस आणि राज्यराणी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मनमाडहून उद्या सुटणार्‍या या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव धवल लोढा (वय 38) असल्याचे वृत्त आहे. लोकलपासून सहा डबे वेगळे झाल्यामुळे आंबिवली ते टिटवाळा या दरम्यान अपघात झाला. लोकलचे कपलींग निघाल्याने घसरलेले डबे इंजिनपासून सुमारे अर्धा किलोमीटर दूर राहिले होते. अपघातानंतर लोकल केवळ चार डबे घेऊन धावत होती. जखमींना कल्याणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली होती.
या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तिंची नावे खालिलप्रमाणे-
महंमद इमाम खान (38), पुजा भोईर (50), मोईन खान (40), करण चंद (25), चौतुद्दिन खान (50) आणि गार्ड आर्यन दुबे (46).