आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांचा खब-याच निघाला मुंबई गँगरेप प्रकरणातील मुख्‍य आरोपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वृत्तछायाचित्रकार तरुणीवर झालेल्‍या सामुहिक बलात्‍कार प्रकरणातील पाचही आरोपी जेरबंद झाले आहेत. धक्‍कादायक बाब म्‍हणजे, त्‍यापैकी एक आरोपी कासिम बंगाली हा पोलिसांचा खब-या होता. मुंबईच्‍या आग्रीपाडा भागात तो राहत होता. त्‍याला घरातूनच सकाळी 4.15 वाजता अटक करण्‍यात आली.

कासिमने यापूर्वी पोलिसांना अनेकदा माहिती पुरवून गुन्‍हेगारांना पकडण्‍यास मदत केली आहे. यावेळी मात्र त्‍याने पोलिसांची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केला. प्राप्‍त माहितीनुसार, तक्रार दाखल झाल्‍यानंतर गुन्‍हे शाखेच्‍या एका कॉन्‍स्‍टेबलने त्‍याला पोलिस ठाण्‍यात बोलावले होते. त्‍याने पोलिसांना चुकीची माहिती दिली. त्‍याच प्रयत्‍नात त्‍याने अशी माहिती दिली जी फक्त पीडित तरुणी आणि तिच्‍या सहका-यालाच ठावूक होती. तिथेच तो फसला आणि पकडल्‍या गेला.

कासिम बंगालीची आई चांद बीबी हिलाही अटक होण्‍याची शक्‍यता आहे. पोलिसांची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचा आरोप तिच्‍यावर ठेवण्‍यात येऊ शकतो. घटनेनंतर ती घराला कुलूप लावून नालासोपारा येथे गेली. कासिम बंगाली विवाहीत आहे. त्‍याच्‍या मुलांना एका नातेवाईकाकडे पोहोचविले आणि शेजा-यांना पोलिसाच्‍या येण्‍या-जाण्‍याची माहिती द्यायला सांगितले.

छेडछाडीला कंटाळून जालन्‍यात मुलीने केली आत्‍महत्‍या... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..

हेदेखील वाचा

दिव्य मराठी विशेष: तरुणींची छेड, लुटमार हा आरोपींचा नित्याचाच धंदा
जीपीएसने काढला मुंबईतील सामुहि‍क बलात्काराच्या आरोप्याचा माग!
आता मुंबईच्या निर्जन स्थळांवर राहणार कडक पोलिस बंदोबस्त
दाभोलकर हत्या प्रकरणी पुण्यातील कुख्यात गुंड सुपारी किलरचा शोध सुरू