आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katju Plea For Sanjay Dutt\'s Mercy Finds Support From Govt

चहा-नाश्त्यानंतर पाच तास मजुरी; कसे असतील \'मदर इंडिया\'च्या पुत्राचे जेलमधील दिवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एका चित्रपटासाठी ३ ते ५ कोटी रुपये घेणारा अभिनेता संजय दत्त याची वर्षाची कमाई जवळपास २० कोटी रूपयांपर्यंत आहे. मदर इंडियाच्या या पुत्राला लवकरच करागृहामध्ये जावे लागणार आहे. तेव्हा, पहिले सहा महिने त्याला जेलमधील छोट्या-मोठ्या कामासाठी ४० रुपये रोज अर्थात १२०० रुपये महिना मिळेल.

बॉलिवूडमध्ये संजूबाबा या नावाने प्रसिद्ध असेलेल्या या अभिनेत्याची कोणत्या जेलमध्ये रवानगी होणार हे अजून निश्चित झालेले नाही. मात्र, जर राज्यपालांनी माफीचा अधिकार वापरला नाही तर, त्याला कारागृहात रोज सकाळी साडे सात वाजतापर्यंत उठावे लागले. चहा - नाष्ता झाल्यानंतर पाच तास त्याला मजुरीचे काम करावे लागले. त्यानंतर दुपारचे जेवन मिळेल. थोडावेळ विश्रांती केल्यानंतर पुन्हा कामाला सुरूवात होईल. संजय दत्तला ही कामे जेलमधील इतर कैद्यांसोबत करावी लागतील.

चित्रपटात खलनायकापासून गांधीगिरी पर्यंत अनेक कामे केलेल्या संजय दत्तला कैद्यांसाठी असलेले कपडे घालून त्यांच्यासोबत अंगमेहनतीची कामे करावी लागणार आहेत. कारागृहातील त्याचा पोषाख म्हणजे एक कुर्ता, पायजमा आणि टोपी असा असेल. त्यासोबतच त्याला दोन कांबळी, एक चटई आणि एक उशी व चादर मिळेल. इथे त्याला जमीनीवरच झोपावे लागणार आहे. घरच्या जेवणालाही तो मुकणार आहे. एवढेच नाही तर, त्याला १५ दिवसांतून एकदा बायको-मुलांना आणि वकीलांना भेटता येणार आहे.

अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेपैकी १८ महिने त्याने जेलमध्ये याआधीच काढले आहेत. उर्वरित साडेतीन वर्षाची शिक्षा माफ व्हावी यासाठी बॉलिवूडसह राजकीय पक्षही सरसावले आहेत. प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना पत्र लिहून त्याच्या माफीची मागणी केली आहे. काटजूंच्या मागणीनंतर बॉलिवूडकरांनीतर त्याच्या माफीची मोहिमच सुरू केली आहे.

टाडा न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर येरवाडा कारागृहात काय करत होता संजय दत्त ? वाचा, पुढील स्लाईडमध्ये.