आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काट्यांची मखमल’ ही स्वरयात्रा : देव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘काट्यांची मखमल’ ही जलेबीबाई, चमेलीच्या जमान्यातील एक सुरेल स्वरयात्रा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी केले. युनिव्हर्सल म्युझिक कंपनीच्या या मराठी गझल अल्बमचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
मुंबईच्या पु.ल.देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की, गायक सुरेश वाडकर, गायिका वैशाली माडे, गझलकार दिलीप पांढरपट्टे आणि या अल्बमचे संगीतकार सुधाकर कदम उपस्थित होते. दिलीप पांढरपट्टे यांचे नाविण्यपूर्ण कल्पना मांडणारे शब्द व सुधाकर कदम यांच्या दीर्घकाळ चिंतनातून तयार झालेल्या स्वररचना असलेल्या या अल्बममध्ये ९ गझलांचा समावेशा आहे. वाडकर आणि वैशालीच्या आवाजातील ‘तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते...’, ‘येता येता गेला पाऊस...’ आणि ‘जीवनाचा खेळ रंगाया हवा...’ या गझलांमधून वेगवेगळे भावदर्शन घडते. सुरेश वाडकर म्हणाले की, ‘या अल्बमला सर्वजण स्वत:शी जोडू शकतील. या गझलांच्या बंदिशीमध्ये सुधाकर कदम यांनी आपला आत्मा ओतला आहे. मोठ्या कालावधीनंतर इतके सुरेल गाणे मला गायला मिळाले, त्याचा आनंद वाटतो. कदम म्हणाले की, गझलेसाठी वेगळ्या प्रकारच्या सुरावटी तयार कराव्या लागतात. संगीतकार अशोक पत्कींनीही या अल्बमचे कौतुक केले.