आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कट्यार', 'नटसम्राट' रंगा पतंगासह दहा चित्रपटांत चुरस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शासनाच्या वतीने उत्कृष्ट मराठी चित्रपटांना दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी नामांकने सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी घोषित केली.५३ व्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी यावर्षी ७३ चित्रपट सहभागी झाले होते. उत्कृष्ट चित्रपट अंतिम फेरीसाठी 'कट्यार काळजात घुसली', 'दि सायलेंस', 'दगडी चाळ', 'बायस्कोप', 'डबलसीट', 'नटसम्राट', हलाल, 'रिंगण', 'रंगा पतंगा' आणि हायवे या चित्रपटांची निवड झाली. दउत्कृष्ट कला दिग्दर्शनसाठी विभागून संतोष फुटाणे (कट्यार काळजात घुसली) व महेश साळगावकर (मितवा), उत्कृष्ट छायालेखन कै.पांडुरंग नाईक पारितोषिक - अभिजित अब्दे (रिंगण), उत्कृष्ट संकलन - क्षितिजा खंडागळे (दगडी चाळ), उत्कृष्ट ध्वनिमुद्रण - प्रमोद थॉमस (डबलसीट), उत्कृष्ट ध्वनिसंयोजन - अनमोल भावे (कट्यार काळजात घुसली) यांना नामांकने मिळाली. अंतिम फेरीनंतर या चित्रपटांमधून पुरस्कारासाठी तसेच सामाजिक प्रश्न हाताळणारा उत्कृष्ट चित्रपट तसेच ग्रामीण प्रश्न हाताळणारा उत्कृष्ट चित्रपट निवडण्यात येईल. प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून रमेश साळगावकर, रत्नाकर पिळणकर, अनिल सुतार, प्रशांत पाताडे, नरेंद्र विचारे, संजय धारणकर, शशिकांत म्हात्रे, नंदू वर्दम, मुकुंद मराठे, मधुरा वेलणकर यांनी काम पाहिले.