आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kavita Karkare Suffers Stroke, Critical In Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कविता करकरे यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 26/11 हल्ल्यातील शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचे ब्रेन हॅमरेजमुळे मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. 27 सप्टेंबर रोजी घरात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांच्यावर उपचार करणार्‍यां डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निदान केले होते.
कविता करकरे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्या बेशुद्ध होत्या. त्यांची ह्रदयक्रिया सुरळीत सुरु व्हावी यासाठी त्यांच्यावर उपचार केले गेले. मात्र, त्या उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे सूत्रांनी सांगितले होते. कविता करकरे यांनी देहदानाचा निर्णय घेतलेला होता, त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मुलांनी त्यांचे देहदान करण्याचे निश्चित केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या त्यात त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्या घरात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि रक्तपुरवठा खंडित झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
पुढील स्लाईडवर वाचा, कविता करकरे करीत होत्या शहिदांच्या पत्नींसाठी काम...