आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘केबीसी’चा म्हाेरक्या भाऊसाहेब चव्हाण जाळ्यात, पत्नीसह मुंबई विमानतळावर अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अल्पावधीत दामदुपटीचे अामिष दाखवून राज्यभरातील लाखाे गुंतवणूकदारांची ४५०हून अधिक कोटींची फसवणूक करून सिंगापूरला पळून गेलेला ‘केबीसी’ कंपनीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब छबू चव्हाण व त्याची पत्नी आरती या दाेघांना शुक्रवारी सकाळी सहा वाजता मुंबईच्या अांतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात अाली. सीबीआय, इमिग्रेशन विभाग आणि नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. शनिवारी त्याला नाशिकच्या न्यायालयासमाेर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चव्हाण दांपत्याच्या विरोधात सीबीआयने रेडकॉर्नर नोटीस बजावल्याने इंटरपोलच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू होता. दोन दिवसांपूर्वी नाशिकचे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना भाऊसाहेब भारतात येणार असल्याची माहिती इंटरपोलकडून मिळाली हाेती. त्या अाधारे अायुक्तांनी सतत संबंधित यंत्रणेच्या संपर्कात राहून सापळा रचला हाेता. अायुक्तांसह पथक गुरुवारी मध्यरात्रीच मुंबई विमानतळावर दाखल झाले हाेते. सिंगापूरहून रात्री एक वाजेच्या सुमारास निघालेले विमान पहाटेच्या सुमारास येणार हाेतेे. त्यानुसार विमानातून बाहेर पडताच भाऊसाहेब व अारतीला इमिग्रेशन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यापाठाेपाठ सीबीआय, इंटरपोल आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटकेची कारवाई पूर्ण केली. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास या दाेघांना नाशिकमध्ये अाणण्यात अाले.

पाळेमुळे रोवण्यास प्रारंभ
नाशिकच्या पंचवटीत राहणारा भाऊसाहेब चव्हाण केमिस्ट होता. २०१२ मध्ये मुलाच्या नावाने केबीसी कंपनी स्थापन केली. जिल्हा बँकेत लिपिक असलेल्या बापूसाहेब या भावाच्या माध्यमातून त्याने चांडवड तालुक्यात ‘केबीसी’ विस्तार केला. राज्यभरात किमान दाेन ते तीन हजार एजंट त्याने नियुक्त केले हाेते. केबीसीतून प्राप्त झालेल्या काेट्यवधींची रक्कम भाऊसाहेबने देशांत गुंतवली हाेती. तसेच मुंबई येथील हवाला अाॅपरेटर संशयित मयंक शहा याच्या मध्यस्थीने विदेशातही त्याने पैसे गुंतवल्याचे सीअायडीच्या तपासात उघडकीस अाले अाहे.

ठेवीदारांचे पैसे परत देण्यास प्राधान्य
भाऊसाहेबवर नाशिक जिल्ह्यात २१० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा आहे. चव्हाण याच्या देशांतर्गत मालमत्तेचा शाेध सुरू असून अटकेनंतर सिंगापूर येथील मालमत्ता, बँक लॉकरही जप्त करण्यात येईल. गुंतवणूकदारांचे पैसे परत कसे करता येईल, यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. एस. जगन्नाथन, पाेलिस अायुक्त

अात्महत्येस प्रवृत्त केले
चव्हाणच्या विरोधात फसवणुकीसह अात्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याची नाेंद आहे. परिचारिका पुष्पलता निकम यांचा मुलगा सागर हा केबीसीचा एजंट हाेता. त्याने लाखाे रुपये कंपनीत जमा केले हाेते. मात्र, चव्हाणने पाेबारा केल्याने गुंतवणूकदारांनी पैशांसाठी पुष्पलता व समीरकडे तगादा लावला. या त्रासामुळे मायलेकांनी आत्महत्या केल्याची घटना घडली हाेती.

अार्थिक नाकेबंदीमुळेच मायदेशी परत
चव्हाण दांपत्याला ताब्यात देण्यासाठी सिंगापूर सरकारवर दबाव वाढत हाेता. त्याच्या अार्थिक नाड्या अावळण्यात अाल्या हाेत्या. हे दांपत्य शारीरिक व्याधीनेही बेजार हाेते. कुटुंबातील सर्वच जवळचे नातेवाईक अटकेत असल्याने व त्यांच्या मागे गुंतवणूकदारांनी तगादा लावल्याने भाऊसाहेब वैफल्यग्रस्त झाला हाेता. त्यातूनच ताे मायदेशी परतल्याची माहिती अाहे.
पुढे वाचा, झटपट श्रीमंत होण्याचे भाऊसाहेबांचे होते स्वप्न...
कसा होता ‘केबीसी’चा मायाजाल, कशी केली गुंतवणूकदारांची फसवणूक...
बातम्या आणखी आहेत...