आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KDMC Mayor Husband Caught On Camera With Bar Dancers.

VIDEO : शिवसेना नेता दिसला बार गर्ल्ससोबत, पक्षाने म्‍हटले यात काय चूक ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कल्याण-डोंबिवलीच्‍या महापौर कल्याणी पाटील यांचे पती आणि शिवसेना नेता नितीन पाटील यांचा एक व्‍हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल झालेत. यामध्‍ये पाटील हे आपल्‍या मित्रांसोबत बार गर्ल्सचे नृत्‍य पाहत पाहत दारू पिताना दिसत आहेत. त्‍यामुळे शिवसेनेवर टीकेची झोड उठली आहे. मात्र, शिवसेनेने पाटील यांची पाठराखण करताना म्‍हटले की, शहरात खुलेआम डान्‍सबार सुरू आहेत. त्‍यामुळे त्‍या ठिकाणी कुणी गेले तर काय बिघडले, अशी प्रतिक्रिया पक्षाच्‍या वतीने देण्‍यात आली आहे.

भाजपच्‍या हाती आयतेच कोलीत
मागील काही दिवसांपासून राज्‍यात शिवसेना-भाजप वाद विकोपाला गेला आहे. त्‍यात या प्रकारामुळे भाजपच्‍या हाती आयतेच कोलीत सापडले आहे. भाजपने केलेल्‍या आरोपात म्‍हटले की, हे फोटो मुंबईतील शाहपूर परिसरामधील मुंबई-नाशिक हायवेवरील एका हॉटेलमधील आहेत. विशेष म्‍हणजे या हॉटेलला दारू विकण्‍याचा परवना नाही. असे असताना या ठिकाणी पाटील आणि त्‍यांचे मित्र दारू पिताना दिसत आहेत, असा आरोप त्‍यांनी केला. भाजप नेता नरेंद्र पवार म्‍हणाले, "राज्‍यात डान्‍सबार आणि बार गर्ल्सचर बंदी आहे. पण, नियम मोडणाऱ्या या नेत्‍यांच्‍या सोबत लोक कसे काय राहू शकतात'', असा प्रश्‍न त्‍यांनी केला.

काय म्‍हटले शिवसेनेने ?
आमचे नेते आणि कार्यकर्ते यांना मुद्दाहून टार्गेट केले जात आहे. बंदी असतानाही शहरात खुलेआम डान्‍सबार सुरू आहेत. त्‍यात आमचे कार्यकर्ते, नेते गेले तर काय बिघडले असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्‍थ‍ित केला.
काय म्‍हणाल्‍या कल्‍याणी पाटील ?
कल्याणी पाटील म्‍हणाल्‍या, "फोटोत आणि व्‍ह‍िडिओमध्‍ये दिसणारी व्‍यक्‍ती माझे पती नाहीत. त्‍या ठिकाणी कॉपी पेस्‍ट करून त्‍यांचा चेहरा लावला आहे. माझे पती असे करूच शकत नाहीत. आम्‍हाला बदनाम करण्‍याचा हा डाव आहे'', असे त्‍या म्‍हणाल्‍या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....