आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहीर साबळेंच्या गाण्यासाठी नातवाला 15 लाखांचा भुर्दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘शाहीर साबळे यांचे एक गाणे माझ्या चित्रपटासाठी वापरायचे होते. मात्र, त्या वेळी कॉपीराइट्सचा मुद्दा आला आणि कॉपीराइट्सचे हक्क असलेल्या पूर्वीच्या एचएमव्ही आणि आताच्या सारेगामा म्युझिक कंपनीने माझ्याकडे 15 लाख रुपये मागितले. सगळ्या गोष्टी केवळ पैशाच्या व्यवहारावर करणार्‍या म्युझिक कंपनीने एवढ्या रकमेत मराठी गाणी घेतली असती का?’ असा सवाल प्रसिद्ध दिग्दर्शक व साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी उपस्थित केला. पारंपरिक गाण्यांना कॉपीराइट्स असता कामा नये, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली.

विठ्ठल उमप लिखित, मधुकर पाठक यांनी संगीत दिलेले आणि शाहीर साबळे यांच्या आवाजातले ‘ये रे ये माझ्या लाडक्या बंधुराजा’ हे गाणे मला एका चित्रपटात वापरायचे होते. मात्र, आता मी नाद सोडला, असे शिंदे यांनी सांगितले. ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटात गाजलेले ‘मल्हारवारी’ हे गाणे मूळ साबळेंच्या आवाजातील होते. ते शिंदे यांनी नव्या ढंगात सादर केले व लोकप्रिय ठरले. आणखी एक गाणे नव्या स्वरूपात आणण्यासाठी धडपड होती. मात्र कॉपीराइट्सचा अडसर येत आहे. शाहीरांच्या अनेक गाण्यांचे रेकॉर्ड्स सारेगामाकडे आहेत. या ऐवजाचे डॉक्युमेंटेशन होत नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

गीतांचा ठेवा पुढील पिढीपर्यंत जाणार कसा?
1985 मध्ये शाहिरांनी दूरदर्शनवर महाराष्ट्राची लोकधारा केले. मात्र, त्या डीव्हीडीचे पुढे काय झाले माहीत नाही. आज यू ट्यूबमुळे आपण जगभरात कुठेही व्हिडिओ पाहू शकतो. मात्र, त्यावर शाहिरांचा एकही व्हिडिओ नाही. मग हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत कसा जाणार? असा सवाल केदार यांनी केला.