आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Keeping MESMA On Strike Going Doctors ; Medical Education Minister Gavit

संपकरी डॉक्टरांना ‘मेस्मा’ लावणार ; वैद्यकीय शिक्षणमंत्री गावित यांचा इशारा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संपकरी निवासी डॉक्टरांवर ‘मेस्मा’नुसार कारवाई करण्याचा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मंगळवारी दिला. त्यांना कामावर येण्यासाठी गुरूवारपर्यंत मुदत दिली आहे. मात्र मागण्या पूर्ण न झाल्याने संप सुरूच ठेवणार असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. संतोष वाकचौरे यांनी सांगितले.


राज्यातील 14 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘मार्ड’ने मंगळवारपासून संप पुकारला असून 4900 डॉक्टर संपावर असल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले. सध्या मिळणाºया विद्यावेतनातील बेसिक रक्कमेत 6600 रुपयांवरून 15,500 रुपये वाढ करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारप्रमाणे निवासी डॉक्टरांना सुविधा देण्यात याव्यात, कामाचे तास आठ करून दर आठवड्याला एक सुटी द्यावी, निवासी डॉक्टरांना सुरक्षा द्यावी, हॉस्टेलचा दर्जा सुधारावा या मागण्यांचाही समावेश असल्याचे डॉ. वाकचौरे यांनी सांगितले. सरकार आपल्यावर मेस्मा लावू शकत नाही. सध्या सुमारे अडीच हजार निवासी डॉक्टरांना कामवार रुजू न झाल्यास हॉस्टेलमधून काढून टाकण्यात येईल, असे पत्र देण्यात आले आहे. पण सरकारने कारवाई केल्यास आंदोलन आणखी तीव्र करू, असे त्यांनी सांगितले.


भत्त्यात 5 हजार वाढ करू : गावित
निवासी डॉक्टरांना प्रशिक्षण भत्ता पाच हजार रुपयांनी वाढवून मिळेल, पण त्यांची मागणी दहा हजार रुपयांची आहे, असे गावित यांनी सांगितले. सरकारी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांची फी कमी असते. सरकार प्रत्येक विद्यार्थ्यावर 30 ते 40 लाख खर्च करते. याचा विचार करून भत्ता दिला जातो. ओबीसी विद्यार्थ्यांच्या फी प्रतिपूर्तीसाठी अर्थसंकल्पात तरतूद झाल्याने त्यांच्या फीचे शुल्क माफ होईल. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयांत सीसीटीव्ही बसवण्याची अटही राज्य सरकारने मान्य केल्याचे गावित म्हणाले.