आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीष बापट यांचे आक्षेपार्ह फोटो FB वर व्हायरल, कॉंग्रेसने साधला निशाणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी एका महिलेचा हात पकडलेला फाेटाे लाल रंगाचे वर्तुळ करून त्यावर अाक्षेपार्ह मजकूर लिहून साेशल मीडियावर व्हायरल करण्यात अाला. या प्रकरणी भाजपच्या जिल्हा पदाधिकारी असलेल्या ३४ वर्षीय महिलेने अज्ञात व्यक्तीविराेधात लाेणीकाळभाेर पाेलिस ठाण्यात िफर्याद दाखल केली असून त्यावरून पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाघाेली येथे बुधवारी कार्यक्रमासाठी अाल्यानंतर एका स्थानिक कार्यकर्त्याच्या घरी गेले हाेते. त्यावेळी सर्व भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांसाेबत फाेटाे काढत हाेते. तेव्हा गिरीश बापट हे मुख्यमंत्र्यांसाेबत कार्यकर्त्यांची अाेळख करून देत हाेते. त्यावेळी बापट यांनी सदर महिलेचा हात पकडल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात ‘बापट हे मला पित्यासमान असून मी मुख्यमंत्र्यांसाेबत फाेटाे काढण्याबाबत विचारत असताना ‘मला इथेच थांब’ असे बापट सांगत असताना हा फाेटाे काढण्यात अाला हाेता’, असा दावा सदर महिलेने केला अाहे.
मात्र सदर कार्यक्रमाचे फाेटाे भाजप अध्यक्ष गणेश कुटे कार्यकर्त्यांनी साेशल मीडियावर अपलाेड केले हाेते. सदर महिला पदाधिकाऱ्याचा अाेळखीचा व्यक्ती निखिल चाैधरी याच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर सतीश जगताप नावाच्या व्यक्तीने हा फाेटाे अपलाेड हाेता. सुहास नारकर नावाच्या फेसबुक अकाउंटवरही हा फोटो अाहे. यातून अापली बापट यांची बदनामी हाेत असल्याची तक्रार सदर महिलेने पाेलिसात दिली अाहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करु शकता. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी करु शकता. धन्यवाद.)