आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khadase Says Registration Is Must To Minority Institute

अल्पसंख्याक संस्थांना नोंदणी करणे बंधनकारक, अल्पसंख्याक मंत्री खडसे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- धार्मिक आणि भाषिक निकषावर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचा दर्जा घेऊन अनेक संस्थांनी अनेक शैक्षणिक संस्था सुरू करून शिक्षणाचे व्यावसायीकरण केले आहे. अशा संस्थांवर निकषानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या आदेशाबरोबरच आता सर्व शैक्षणिक संस्थांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा झाली असून लवकरच नोंदणी बंधनकारक करणारा शासनादेश काढला जाणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री एकनाथ खडसे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचा दर्जा मिळालेल्या २,४७२ शिक्षण संस्था राज्यात आहेत. नियमानुसार या शैक्षणिक संस्थांमध्ये भाषिक व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना एकूण क्षमतेच्या ७० टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे, परंतु अनेक संस्था असा प्रवेश न देता जागा विकत असल्याचे समोर आले होते. राज्य सरकारने याबाबत गंभीरता दाखवत अशा संस्थांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती.
राज्यातील १३ महाविद्यालये आणि १० शाळांना नियमानुसार प्रवेश न दिल्याबद्दल नोटिसा देण्यात आल्या असून एचआरसारख्या महाविद्यालयांनी आपल्या वकिलांकडून भलेमोठे उत्तर पाठवले असून त्याचा अभ्यास सुरू असल्याचे एकनाथ खडसे यांनी या वेळी बोलताना सांगितले.