आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दोषत्व पटवण्यासाठी खडसे यांची दिल्लीवारी, मोदींची भेट नाहीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महसूल मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत गेलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मिळाली नाही. त्यानंतर शुक्रवारीच खडसे मुंबईत परतले. मात्र, या भेटीत त्यांनी भाजपच्या इतर ज्येष्ठ नेत्यांची तसेच इतर मंत्र्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा तसेच निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आपली दिल्लीवारी ही वैयक्तिक कारणासाठी होती. आपल्यावरील आरोपांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आपण दिल्लीतील नेत्यांना भेटणार आहोत, असा खुलासा खडसे यांनी केला आहे.

गुरुवारी संध्याकाळी खडसे दिल्लीत पोहोचले. त्यानंतर त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात समन्वय साधणारे रामलाल, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी घेतल्या. या सर्वांना भेटून त्यांनी आपण निर्दोष असल्याचे पुरावे सादर करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
मोदी हे शुक्रवारी सकाळी दिल्लीत पोहोचल्याने त्यांची भेट झाली नसल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर मोदी स्वत:ही खडसे यांना भेटण्यास इच्छुक नसल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. खडसे यांनी मात्र आपली दिल्लीवारी कोणा नेत्यांना भेटण्यासाठी नव्हती, तर वैयक्तिक कारणांसाठी होती, असा दावा केला आहे.

पुढे वाचा...
> गुरुवारी खडसे दिल्लीला पोहाेचताच ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांना भेटून आपली बाजू स्पष्ट करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले
> दाऊद कॉल प्रकरणी क्लीन चिट मिळण्याची शक्यता
बातम्या आणखी आहेत...