आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकावे ते नवलच: पुणे- मुंबई शहरात तब्बल 400 शेतकरी कोट्याधीश...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेती व कृषी उत्पन्नावर इनकम टॅक्स लागत नसल्यामुळे काळा पैसा पांढरा करण्यासाठी मुंबई व पुणे शहरातील तब्बल 404 जणांनी आपल्याला शेतीतून 1 कोटींहून अधिक रूपयांचे उत्पन्न झाल्याचे दाखवल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. शहरी भागात जास्त शेतीच होत नसताना या लोकांनी कोट्यावधीचे उत्पन्न नफा कसे मिळवले याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे, शेती तोट्याचा उद्योग म्हणून पुढे येत असताना व देशात दरवर्षी हजारोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करीत असताना या लोकांना कोट्यावधीचा नफा कसा काय मिळू शकतो, या चर्चेला तोंड फुटले आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेती उत्पन्न दाखवून देशाची फसवणूक केली जात यामुळे उघड होत आहे. केंद्र सरकार या सर्वांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
- शेतीच्या उत्पन्नावर इनकम टॅक्स लागत नसल्याने अनेक नोकरदार व छोटे उद्योजक शेतीतून उत्पन्न मिळविल्याचे दाखवितात.
- या विरोधात बिहारची राजधानी पाटणा हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल झाली होती. यात काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेतीतील जास्त उत्पन्न दाखवण्यात आल्याचे म्हटले होते.
- यानंतर हायकोर्टाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सीबीडीटी विभागाने याबाबत इनकम टॅक्स विभागाला चौकशीचे आदेश दिले होते.
- गेल्या नऊ वर्षात देशातील 2746 लोकांनी शेतीतील उत्पन्न एक कोटी रूपयांपेक्षा अधिक जास्त असल्याचे दाखवले आहे.
देशाचे 2000 लाख कोटींचे नुकसान- शरद यादवांचा आरोप
- शेतीमधून होणारे उत्पन्न दाखवत देशातील लोकांनी 2000 लाख कोटी रुपये लपवले असल्याचा आरोप जदयू नेते शरद यादव यांनी या अहवालांचा हवाला देत केला. - ही रक्कम देशाच्या जीडीपीचा विचार केल्यास त्या तुलनेत ही सुमारे 15 टक्के इतकी आहे.
- या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी बसपच्या प्रमुख मायावती यांनी केली.
- या प्रकरणाच्या आड सरकार शेतीवर टॅक्स लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सपाचे रामगोपाल यादव यांनी केला.
- यावर शेतीवर कोणताही ट्रक्स लावण्याचा सरकारचा विचार नसल्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राज्यसभेत सांगितले आहे.
या लोकांची नावे जाहीर करा- काँग्रेसची मागणी
- संयुक्त जनता दल, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाच्या वतीने राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला
- जास्त कृषी उत्पन्न दाखवणा-या अनेक उच्चपदस्थ लोकांची चौकशी सुरू असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
- चौकशीनंतर कोणाचेही नाव समोर आल्यास याला 'राजकीय सूड' असे नाव देऊ नका, असा खोचक टोला जेटली यांनी लावला.
- खासदारांनी वारंवार विचारल्यावरही या प्रकरणात कोणाचेही नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.
- अर्थमंत्र्यांनी यात कोणाची नावे आहेत अशी 'धमकी' देण्याऐवजी सरळसरळ अशा लोकांची नावे जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली.
सर्वात जास्त कृषी उत्पन्न असणारी शहरे ( शहर व त्यापुढे एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न दाखवलेल्यांची संख्या)

बंगळुरू- 321
दिल्ली- 275
कोलकाता- 239
मुंबई- 212
पुणे- 192
चेन्नई- 181
हैदराबाद- 162
तिरुवनंतपुरम- 157
कोची- 109
बातम्या आणखी आहेत...