आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमीने आम्हीच \'खास\' म्हणत केला 200 कोटींच्या मालकिनीचा पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पनवेल तालुक्यातील खारघर येथील ग्रामपंचायतीत निवडणुकीत कोट्याधीश मालकिन लीना गरड यांचा 'आम आदमी'ने पराभव करीत आम्हीच खास असल्याचे दाखवून दिले आहे. 200 कोटींच्या मालकिन असलेल्या लीना यांचा वनिता पाटील या महिलेने तब्बल 1500 मतांनी पराभव केला. तसेच भारतीय लोकशाहीत कोट्याधीशांपेक्षा सामान्य जनता सर्वश्रेष्ठ असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे 200 कोटींच्या मालकिनीचा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव होत आहे तर तिकडे, दिल्लीत जनतेच्या जीवावर सामान्य लोक विधानसभेत पोहचले आहेत. बदलत्या भारताचे हे चित्र निश्चित सुखद आहे.
खारघर ग्रामपंचायत निवडणुक कधी नव्हे ती लक्षवेधी ठरली. एका पोलिस अधिका-याची पत्नी असलेल्या लीना गरड यांनी ग्रामपंचायत सदस्यत्वसाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी आपल्याकडे 200 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले. यामुळे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लीना गरड आणि खारघरकडे लागले. मात्र अखेर सोमवारी या ग्रामपंचायतीचा निकाल आला आणि खारघरमधील सामान्य जनतेने 200 कोटींच्या मालकिन लीना गरड यांचा तब्बल 1500 मतांनी पराभव करून आम्हीच खास असल्याचे दाखवून दिले.
17 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व शेकाप व युतीने जिंकल्या. तर खारघर कॉलोनी फोरमतर्फे लढलेल्या लीनासह त्यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला.
पुढे वाचा, लीना गरड आणि त्यांच्या संपत्तीबाबतची माहिती आरोप-प्रत्यारोपासह...