आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kharghar Toll Plaza Start Once Again, Kharghar, Kamothe Toll Plaza Vandalised By Mns

खारघरमध्ये टोलधाड पुन्हा सुरु, मनसेकडून तोडफोड; वाहनांच्या लांबच लांब रांगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी मुंबईतील खारघरमधील टोलनाक्यावर पुन्हा एकदा मध्यरात्री 12 वाजल्यापासून टोल घेण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, टोल घेण्यास सुरुवात झाल्याने मुंबई-पुणे महामार्गावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा सकाळपासून लागल्या आहेत. सत्तेत येण्यापूर्वी भाजपने टोल बंद करण्याचे आश्वासन दिले होते ते न पाळल्याने आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी खारघर टोलनाक्याची तोडफोड केली आहे.
गेल्या वर्षभरापासून वादाच्या केंद्रस्थानी असलेला नवी मुंबईजवळचा खारघरचा टोल नाका अखेर सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आला. असे असले तरी कोपरा, खारघर, कामोठे, कळंबोली व पनवेल या पाच स्थानिक गावांतील वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिसूचनेनंतर त्वरित वसुली सुरू करण्याचा निर्णय सायन पनवेल टोलवेज कंपनीने घेतला आहे. पण टोलवसुली सुरू होताच पहाटे सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड मोठा ट्रॅफिक जाम झाले आहे. आज सकाळपासून टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होती. दोन्ही बाजूला चार-चार किलोमीटरपर्यंत गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे अखेर टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्यात आली. दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी खारघर टोलनाका फोडला आहे. टोलनाक्याची मोठ्या प्रमाणात नासधूस करून हे कार्यकर्ते पसार झाले. त्यानंतर टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
बीएआरसी जंक्शन ते कळंबोली जंक्शन या 25 किलोमीटरच्या आठपदरी रस्त्यासाठी ही टोलवसुली सुरू झाली आहे. याला रस्त्याला सुमारे 1200 कोटी खर्च झाले आहेत. 17 वर्षे आणि 5 पाच महिने ही वसुली सुरू राहणार आहे. सायन-पनवेल महामार्गावर खारघर स्पॅगेटीजवळ हा टोलनाका उभारण्यात आला आहे. या टोलधाडीच्या विरोधात काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात आघाडी उघडत भाजपात प्रवेश केला. भाजपच्या तिकीटावर आमदार झालेले प्रशांत ठाकूर आता शांत बसले असून, त्यांनी आपल्या मतदारसंघातील 5 स्थानिक गावांतील गाड्यांना या टोलधाडीतून मुक्ती दिली आहे.
पुढे पाहा मनसेनी केलेली तोडफोड व वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा...