आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेमय्यांचा ‘सामना’वर अब्रुनुकसानीचा दावा, एक कोटींंची भरपाई मागितली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ वर्तमानपत्र, त्याचे संपादक खासदार संजय राऊत, प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविराेधात भाजपचे खासदार किरीट साेमय्या यांनी शुक्रवारी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला अाहे. ‘सामना’मध्ये बदनामीकारक लिखाण झाल्याने अापली प्रतिमा मलिन झाली, त्यामुळे एक काेटी रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी साेमय्या यांनी न्यायालयात केली अाहे. तसेच पत्रकार परिषद घेऊन झाेपडपट्टी पुनर्विकास याेजनेत गैरव्यवहाराचे अाराेप करणाऱ्या कल्पना इनामदार यांच्यावरही साेमय्यांनी दावा ठाेकला अाहे.
पुढे वाचा.. साेमय्या व त्यांच्या पत्नींनी काळा पैसा अनेक उद्याेगांत गुंतवला असल्याचा अाराेप इनामदार यांनी केला हाेता
बातम्या आणखी आहेत...