आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसकेंनी केला 1200 कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्रालयास पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांनी 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी लावला आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसके ग्रुपने 1200 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करत यासंबंधी मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय आणि PF आयुक्तांकडे सोमय्यांनी तक्रार सुद्धा केली आहे. याबाबत कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. 
 
 
- डीएसकेंनी 2015 सालापासून 750 कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा केलेला नाही. असा दावाही किरीट सोमय्या यांनी डीएसकेंवर केला आहे.
- सोमय्या यांनी याप्रकरणी ट्विटही केले आहेत. त्यामुळे आता डीएसकेंवर नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
- गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणुकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत.
- 2014 पासून अनेकांनी घरं बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. 2014 पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली.
बातम्या आणखी आहेत...