आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kirit Somaiyya Claims Fraud In Maharashtra Sadan Construction

महाराष्ट्र सदन बांधकाम; 100 कोटी रुपयांचे चटईक्षेत्र देऊन विकासकावर खैरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र सदन बांधकामाच्या बदल्यात विकासकावर करारापेक्षा अधिक चटईक्षेत्राची खैरात करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. नगरविकास खात्याचे प्रमुख या नात्याने सदन बांधकाम घोटाळ््यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन, मुंबईतील आरटीओ आणि एका अतिथिगृहाचे बांधकाम चमणकर या विकासकास दिले. 2005 मध्ये दिलेल्या ‘बीओटी’ तत्त्वावरील या कामाला 72 कोटींचा खर्च अपेक्षित होता. त्याच्या मोबदल्यात विकासकाला मुंबईत 100 कोटी रुपये किमतीचे चटईक्षेत्र उपलब्ध करून देण्यात येणार होते. या कामाच्या मोबदल्यात नगरविकास खात्याने विकासकाला यापूर्वी 50 हजार चौ. फू. चटईक्षेत्र दिले आहे. जूनमध्ये पुन्हा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात (एसआरए) 50 हजार चौ. फू. चटईक्षेत्र देण्यात आले. म्हणजेच चमणकर यांनी केलेल्या 72 कोटीच्या बांधकामासाठी 1 हजार कोटी रुपयांचा हस्तांतरणीय विकासाधिकार (टीडीआर) मुंबईत प्राप्त झाला, असा सोमय्या यांचा आरोप आहे.

बीओटी तत्त्वाचा हा करार सार्वजनिक बांधकाम खात्याने केला. मात्र, टीडीआर देण्याची कार्यवाही नगरविकास खात्याने केली. त्यामुळे याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही हात ओले झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला.


याची उत्तरे बाबा देतील काय?

०उद्घाटन झाले, पण अजूनही सदन सुरूका नाही ?

सदनातील 100 कामे अजूनही अर्धवट. मग टीडीआर देण्याची घाई का ?

सदनाच्या कामातील घोटाळ््याचा भ्रष्टाचारविरोधी शाखा (एसीबी) करत असलेला तपास केव्हा पूर्ण होणार ?

करारावर ‘कॅग’ने मारलेल्या ताशेर्‍यांचे काय ?

माझं म्हणणं खोटं असेल, तर माझ्यावर बदनामीचा दावा करा ?

सदन अर्धवटच
महाराष्ट्र सदनाचे काम अद्याप अर्धवट आहे. तत्पूर्वीच विकासकावर टीडीआरची खैरात का, असा सवाल करत अर्धवट कामाचे उद्घाटन करून राज्य शासनाने राष्ट्रपतींचा अपमान केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला.