आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई मनपा निवडणुकीत स्वबळावर लढणार भाजप, खासदार साेमय्यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारावर सतत तोंडसुख घेत तक्रारी करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी अापला पक्ष मुंबई मनपाची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घाेषणा केली. मनपाच्या २२७ जागांवर निवडणुका लढवून शिवसेनेचे माफिया राज संपवणार असल्याचे ते म्हणाले. मात्र काही वेळातच साेमय्यांचे मत ही पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्टीकरण लगाेलग भाजपच्या वतीने देण्यात अाले. दरम्यान, शिवसेनेच्या अनिल परब यांनी साेमय्या यांना भुंकणारा कुत्रा म्हणत जाेरदार टीका केली. त्यामुळे अागामी मुंबईत मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपात वादाला सुरुवात झाली अाहे.

किरीट सोमय्या यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले, ‘शिवसेनेने मुंबई महापालिकेला माफियांचा अड्डा बनवून टाकला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप मुंबईतील छोट्या-छोट्या पक्षांना सोबत घेऊन २२७ जागा लढवून सत्ता प्राप्त करील आणि शिवसेनेचे माफियाराज संपवून टाकेल.’

साेमय्या यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेतील नेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. अनिल परब यांनी लगेचच पत्रकार परिषद घेत, ‘सोमय्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून साेमय्या हा भुंकणारा कुत्रा आहे. त्याच्या वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही,’ असे सांगत त्यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी साेमय्यांनी शिवसेनेवर टीका केली हाेती. वांद्र्यातील ‘बॉस’ आणि त्यांच्या ‘पीए’च्या आदेशावरून मुंबई महापालिकेत माफिया राज सुरु असल्याचा अाराेप त्यांनी केला हाेता. यावर अनिल परब म्हणाले, ‘साेमय्या यांनी नाव घेऊन टीका करावी मग शिवसेना त्याला उत्तर देईल.’

दुसरीकडे भाजप नेतृत्वाने मात्र महापालिका निवडणुकांबाबत पक्षाने कोणताही निर्णय घेतलेला नसून साेमय्या यांनी वैयक्तिक भूमिका मांडल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीचे अधिकार स्थानिक नेत्यांना असले तरी युतीबाबत चर्चेची ही वेळ नसल्याचे प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा शिवसेनेचे प्रत्युत्तर
बातम्या आणखी आहेत...