आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मातोश्री\'वर चाकू घेऊन घुसलेला इसम पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ओळख बनून राहिलेले व सध्या उद्धव ठाकरेंसह ठाकरे परिवार राहत असलेल्या कलानगरमधील मातोश्री या निवासस्थानी आज दुपारी एका अनोळखी इसमाने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला. संबंधित इसम मातोश्रीत घुसण्यात यशस्वी झाला मात्र, सुरक्षा रक्षकांच्या सर्तकर्तेमुळे त्याला ताब्यात घेण्यात यश मिळाले. सदर इसमाकडे चाकू व ब्लेड आढळून आला. त्याचे नाव अद्याप समोर आले नाही. मातोश्रीवर घुसण्याचे कारण काय याची चौकशी पोलिस त्याच्याकडे करीत आहेत.
आज दुपारी 1 च्या सुमारास कलानगर परिसरात असलेल्या मातोश्री बंगल्याच्या बाहेर घुटमाळत होता. काँग्रेसचे नगरसेवक अनिल पाटणकर आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. ते मातोश्रीवर जात असतानाच संबंधित इसम प्रवेश द्वारातून आत घुसला.
दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे चाकू व ब्लेड आढळून आले. खेरवाडी पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची कसून चौकशी करीत आहेत. दरम्यान, आपण व्यवसायाने नाभिक असल्याने चाकू बाळगत असल्याचे संशयिताने सांगितले. तसेच आपले नाव राम मिलन शर्मा असल्याचे सांगितले.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, शर्माने कोणत्या प्रकारचा आणला होता चाकू....
बातम्या आणखी आहेत...