आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमृता फडणवीस या कारणांमुळे राहतात चर्चेत, जाणून घ्‍या खास बाबी..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या पत्‍नी अमृता फडणवीस सध्‍या दिग्‍विजय सिंह यांच्‍या ट्विटमुळे चर्चेत आल्‍या आहेत. दिग्विजय यांनी 18 मार्च रोजी केलेल्या वादग्रस्त ट्विटविरोधात मुख्‍यमंत्र्यांनी त्‍यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. अमृता यांच्याबाबत ट्वीट करुन दिग्विजय यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वशिलेबाजीचा आरोप केला होता.
दिग्विजय सिंह यांचे असे होते ट्विट..
‘मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील एसआरए (झोपडपट्टी पुनर्विकास) विकासकांना अॅक्सिस बँकेच्या केवळ वरळी शाखेतच अकाउंट उघडायला सांगितले आहे.’ असे दिग्विजय यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘मिसेस फडणवीस अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. अॅक्सिस बँकेसारख्या प्रायव्हेट बँकेला मोठा आर्थिक लाभ झाला. ही वशिलेबाजीची हद्द आहे.’ अशा
आशयाचे ट्वीट दिग्विजय यांनी केले.
हातचलाखीतून बाबांनी दिले होते मंगळसूत्र..
अमृता फडणवीस यांना एका स्‍वयंघोषित बाबांनी हातचलाखी दाखवून मंगळसूत्र दिल्‍याच्‍या घटनेने खळबळ उडाली होती. राज्‍यात एकीकडे अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्‍याची मागणी होत असताना. दुसरीकडे चक्‍क मुख्‍यमंत्र्यांच्‍या पत्‍नीसमोर भोंदूगिरी झाल्‍याने त्‍या वादात सापडल्‍या होत्‍या.
कोण आहेत अमृता..
- अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आहेत.
- देवेंद्र फडणवीस मुख्‍यमंत्री झाल्‍यानंतर त्‍या मुंबईत आल्‍या. मात्र, नोकरी सोडण्‍याचा त्‍यांनी विचार केला नाही.
- अमृता यांचे आई-वडिल डॉक्टर आणि त्‍या बँकिंग क्षेत्रात आहेत.
- माहेरी कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्‍या अमृता यांचा फडणवीसांसोबत प्रेमविवाह झाला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, अमृता यांच्‍याबाबत काही खास बाबी..
बातम्या आणखी आहेत...