आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने धावतात या कार, बुलेट ट्रेनपेक्षा 100 Kmph ने जास्त आहे यांचा वेग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्सॅटमध्ये बुलेट ट्रेनपेक्षा 100 kmph ने धावणारी वेनम जीटी स्पाइडर कार. - Divya Marathi
इन्सॅटमध्ये बुलेट ट्रेनपेक्षा 100 kmph ने धावणारी वेनम जीटी स्पाइडर कार.
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी हायस्पीड रेल्वे ट्रॅक प्रशिक्षण संस्थेचेही भुमीपूजन केले. जपानच्या सहकार्याने बनणारा हा प्रकल्प 2022 पर्यंत पुर्ण होईल अशी व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ताशी 320 किलोमीटर वेगाने धावले असे सांगण्यात येत आहे. ही देशातील सर्वाधिक वेगावे धावणारी रेल्वे असेल असे सांगण्यात येत असले तर जगभरात यापेक्षाही अधिक वेगाने धावणाऱ्या कार आहेत. अशाच काही कारची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.      
 
बुलेट ट्रेन प्रकल्पावर एक नजर
- भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालणार आहे. हा मार्ग 505 किलोमीटरचा आहे.
- सध्या या मार्गावर कमीत कमी लागणारा वेळ हा 7 तासांचा आहे.
- 320 KMPH च्या वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. त्यामुळे मुंबईहून अहमदाबादला केवळ 2 तासात जाता येईल.
- या प्रकल्पाची किंमत 98 हजार कोटी रुपये असेल. यातील 81% कॉस्ट जपान उचलेल.
- या मार्गावर 11 बोगदे असतील. त्यातील एक बोगदा हा समुद्रात असेल.
- 1% पेक्षा कमी व्याजदराने यासाठी जपान कर्ज देणार आहे. हे कर्ज 50 वर्षांसाठी असेल.
 
ही आहे जगातील सर्वात वेगवान कार
- अमेरिकेतील कार कंपनी हेनेसीची कार ही जगातील सर्वात वेगाने धावणारी कार आहे. या कारची नोंद गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.
- वेनम जीटी स्पायडर नावाच्या या कारमध्ये बुगाटी वेरोन कारचा विक्रम तोडला होता. तिचा वेग 431 किलोमीटर प्रति तास होता. या कारचा वेग ताशी 435 किलोमीटर इतका आहे.
- जगभरात या फक्त 3 कार आहेत. या कारच्या वेगाचा अंदाज याच गोष्टीमुळे लागू शकतो की ही कार फक्त 13.63 सेकंदात 300 किलोमीटरचा वेग गाठते.
- तर 2.4 सेकंदात ती ताशी 100 किलोमीटरचा वेग गाठते. तिचा टॉप स्पीड इतका आहे की ती 3 तासात मुंबई ते दिल्लीचे अंतर गाठते.      
 
पुढील स्लाईडवर पाहा बुलेट ट्रेनपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या कार
बातम्या आणखी आहेत...