आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Remarkable India Visit Of World Famous Personalities

विल्यम-केटप्रमाणेच जगातील या पॉवरफुल लोकांनी दिलीय भारताला भेट, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2003 मध्ये भारतात फिरायला आलेल्या ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी मुंबईतील डब्बेवाल्यांची भेट घेतली होती. - Divya Marathi
2003 मध्ये भारतात फिरायला आलेल्या ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी मुंबईतील डब्बेवाल्यांची भेट घेतली होती.
मुंबई- ब्रिटनमधील रॉयल फॅमिली राजकुमार विल्यम (ड्यूक ऑफ क्रेंब्रिज) आणि त्याची पत्नी केट मिडेलटन 7 दिवसाच्या भारत दौ-यासाठी रविवारी मुंबईत दाखल झाले आहेत. या शाही दाम्पत्याने रविवारी दिवसभर मुंबईत खूप आनंद लुटला. या शाही दाम्पत्याच्या आधी जगभरातील बड्या हस्तिया भारतात आल्या होत्या. यातील कोणी मुंबईतील डब्बेवाल्यांना भेटला तर कोणी पुण्यातील रेड लाईट एरियात फिरला. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वर्ल्ड फेमस पर्सनालिटीजबाबत सांगणार आहोत ज्यांना भारत खरोखरच मस्त वाटला.
मुंबईत विल्यम-केटचा असा राहिला पहिला दिवस-
- विल्यम आणि केट यांनी मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये पोहचताच 26/11 च्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली.
- यानंतर या शाही दाम्पत्याने दुपारचे जेवण हॉटेल ताजमध्ये घेतले. शाकाहरी कबाब, वरणभात, भेंडी फ्रायची भाजी व इतर पदार्थ असा खास मेन्यू त्यांच्यासाठी होता.
- जेवणानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर प्रिन्स आणि प्रिन्सेस विल्यम-केट यांनी मुंबईतील ओव्हल मैदानावर जाणे पसंत केले.
- एका स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेल्या मदतनिधी सामन्याला या जोडप्याने हजेरी लावली. यावेळी सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली, दिलीप वेंगसरकर आदी उपस्थित होते.
- या सामन्यानंतर विल्यम आणि केट यांनी झोपडपट्टीतील मुलांसमवेत संवाद साधला व त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.
- यानंतर सायंकाळी या शाही दाम्पत्याने दक्षिण मुंबईतील वाळकेश्वरमधील ऐतिहासिक बाणगंगा तलावाला भेट दिली.
- रात्री उशिरा ताज महाल हॉटेलमध्येच बॉलिवूड व मुंबईतील उद्योगविश्वातील सेलिब्रेटी आणि शाही दाम्पत्य यांच्या स्नेहभेटीचा आणि स्नेहभोजनाचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रिन्स यांना मानावी लागली होती डब्बेवाल्यांची शर्त-
- विल्यम आणि केट यांच्याऐवजी 2003 मध्ये इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स चा‌र्ल्स मुंबईत आले होते. ते डब्बेवाल्यांची शिस्तप्रिय आणि नियोजबद्ध कार्यशैलीमुळे प्रभावित झाले. प्रिन्स चार्ल्स यांनी डब्बेवाल्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
- प्रिन्स यांची इच्छा असतानाही डब्बेवाल्यांनी त्यांच्यापुढे दोन शर्त ठेवल्या. पहिली ही की, ते प्रथखम डब्बे पोहचवतील व मोकळ्या वेळेत ते भेटतील. त्यांचे म्हणणे होते की, प्रिन्स यांच्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकाला त्रास देऊ शकत नाही.
- दूसरी अट अशी होती की, प्रिन्स यांनाच आम्हाला भेटायला यावे लागेल. या दोन्ही शर्ती प्रिन्स यांनी मान्य केल्या. प्रिन्स यांनी डब्बेवाल्यांशी एक तास त्यांच्यासमवेत घालवला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कशी होती जगभरातील वर्ल्ड फेमस पर्सनालिटीजची भारत भेट...