आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टल्ली बाबा करतो डिलिंग.. राधे माँ \'माता की चौकी\'मध्ये भक्तांना करते \'किस आणि हग\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर स्वत:ला 'देवी'चा अवतार असल्याचे सांगणारी राधे माँ हिच्या अडचणी वाढल्या आहेत. राधे माँ‍ हिच्या विरोधात खटला दाखल करण्याची मागणी पंजाबमधील फगवाडा येथील राहाणारे सुरेंदर मित्तल यांनी हाईकोर्टाकडे केली आहे.

राधे माँ विरोधात मुंबईतील एका बिझनेसमनने बोरीवली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. विना पैशाचे ती कोणतेही काम करत नसल्याचा आरोप तिच्या काही अनुयायींनी केला आहे. 'माता की चौकी'साठी वेगवेगळी किंमत मोजावी लागत असल्याचे काहींनी म्हटले आहे.

काय आहे सुरेंदर मित्तल यांच्या याचिकेत...
- फगवाडा येथील सुरेंद्र मित्तल यांनी हायकोर्टात राधे माँ विरोधात याचिका दाखल केली आहे. राधे माँकडून त्यांना धमक्याही मिळत आहेत.
- सुरेंद्रर यांनी सांगितले की, त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु, पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.
- या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोर्टाने कपूरथला पोलिसांची चांगलीच कानउघाडणी केली होती.

मुंबईच्या बिझनेसमन दिली होती पोलिसांत तक्रार...
 - मुंबईतील प्रसिद्ध 'एमएम मिठाईवाला'चे मालक मनमोहन गुप्ता यांनीही राधे माँ विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मुलाला चिथवून बंगला हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी राधे माँवर केला होता.
- मनमोहन गुप्ता यांनी सांगितले की, राधे माँने मुलगा राजीव व संजीव यांच्यासह त्यांचे बंधु जगमोहन यांच्यावर काळी जादू केली आहे. त्यांना माझ्याविरोधात चिथवून बंगल्यावर ताबा मिळवण्याचा तिचा हेतू आहे.
- दरम्यान, मनमोहन गुप्ता यांनी सुखविंदर कौर उर्फ राधे माँ हिला मुंबईत राहाण्यासाठी जागा दिली होती.

'माता की चौकी'चे 'रेटकार्ड'
- राधे माँची माता की चौकीचे रेटकार्ड समोर आले आहे.
- जो भक्त चौकीचे आयोजन करत होता, त्याला हे रेटकार्ड दिले जात होते. राधे माँ सांगेल ती इच्छा त्याला पूर्ण करावी लागत होती.
- राधे माँच्या एका चौकीचा खर्च 5 लाख ते 35 लाख रुपये होता.
- भक्ताची आर्थिक कुवत पाहून चौकीच्या खर्चात कमी जास्त केले जात होते.
- चौकीचे आयोजन तसेच डीलिंगचे काम राधे माँचा सिपेसालार अर्थात एजेंट टल्ली बाबा करत होता.
- सूत्रांनूसार, मोठ्या चौकीचे आयोजन करणार्‍या भक्ताला राधे माँचा किस, त्यांची गळाभेट आणि कुशीत बसण्याची संधी दिली जात होती.

राधे माँचे सिपेसालारांविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...