आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींनी यामुळे मुलीचे नाव ठेवले \'ईशा\' तर, मुलाचे \'आकाश\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाश अंबानी आणि ईशा अंबानी.... - Divya Marathi
आकाश अंबानी आणि ईशा अंबानी....
मुंबई- देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचा मालक मुकेश अंबानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्स मॅगझीनच्या रियल टाईम बिलेनियर्सच्या यादीत मुकेशने 42.1 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 2 लाख 73 हजार 650 कोटी रुपयांची एकून संपत्तीसह चीनच्या हुई यान याला मागे टाकले आहे. मुकेश अंबानीच्या या ग्रोथमध्ये त्याचा मुलगा आकाश आणि मुलगी ईशा अंबानीचेही योगदान आहे. दोघे आज मुकेश यांचा बिजनेस पुढे घेऊन चालले आहेत. दोघे मुकेशच्या खूपच जवळ आहे आणि दोघांचेही नामकरण केले होते. रोचक आहे दोघांच्या नामकरणाची कहाणी...
 
- एका टीव्ही इंटरव्यूमध्ये नीता अंबानीने सांगितले होते की, ईशा आणि आकाशच्या जन्मावेळी मी यूएसमध्ये होते. आम्हाला सोडून मुकेश भारतात परत पोहचले तोच त्यांना फोन आला की, तुम्हाला परत यावे लागेल. कारण नीता कधीही मुलांना जन्म देऊ शकतात. 
- यानंतर मुकेश आपली आई आणि एक डॉक्टरसह स्पेशल प्लेनने यूएसला निघाले. रस्त्यातच प्लेनचा पायलट त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, तुम्हाला दोन मुले झाली आहेत. त्यातील एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
- या वृत्ताने विमानात जल्लोषाचे वातावरण झाले आणि जेव्हा मुकेश नीताजवळ पोहचले तेव्हा मुलांचे नामकरण करणार असल्याचे सांगितले.
- या दरम्यान त्यांनी म्हटले आहे की, "मी विमानातून पर्वतावरून येत होतो तेव्हाच मला खूषखबरी मिळाली. यामुळे माझ्या मुलीचे नाव 'ईशा'. याचा अर्थ पर्वताची देवी. आम्ही आकाशातून उडत होतो त्यामुळे मुलाचे नाव 'आकाश'.
 
ईशाकडे रिलायन्स टेलीकॉम आणि रिटेलची जबाबदारी- 

- मुकेशची मुलगी ईशा सध्या रिलांयन्स जिओची जबाबदारी संभाळत आहे. ईशा रिलायन्सची टेलीकॉम आणि रिटेल कंपन्यांची डायरेक्टर आहे. 
- रिलायन्समध्ये येण्याआधी अमेरिकेत ग्लोबल कन्सल्टंसी फर्म मॅकिंन्समध्ये काम केले आहे. 
- ईशाने 2013 मध्ये येल यूनिवर्सिटीमधून सायकोलॉजी आणि साउथ एशियन स्टडीजमध्ये ग्रॅजुएशन केले आहे. 
- 2008 मध्ये 16 व्या वर्षी ईशा तेव्हा चर्चेत आली जेव्हा फोर्ब्सच्या यादीत श्रीमंत वारस म्हणून पुढे आली.
 
आता आकाश काय करतोय-
 
- आकाश अंबानी सुद्धा रिलायन्स जिओचा प्रोजेक्ट हेड-डायरेक्टर आहे. तो रिलायन्स रिटेल बोर्डचा सदस्य ही आहे.
- त्याला महागड्या कारचा शौक आहे. एका टीव्ही इंटरव्यूमध्ये नीताने सांगितले होते की, आकाशला भले ही महागड्या कारचा शौक असेल, पण तो कारने कधीही स्कूलमध्ये गेला नाही.
- मुकेश अंबानी आपल्या मुलांना महागड्या कारने नव्हे तर पब्लिक ट्रान्सपोर्टने पाठवायचे. त्यांना घराबाहेर जाण्याची परवानगी खूप कमी वेळ मिळते.
 
ब्राउन यूनिवर्सिटीतून शिक्षण-
 
- आकाशने अमेरिकेने ब्राउन यूनिवर्सिटीतून इकॉनॉमिकमध्ये ग्रॅज्यूएशन केले आहे. त्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. 
- त्याचे हे स्कूल त्याची आई नीता अंबानी चालवते. हा स्कूल आपल्या एक्स्ट्रा कॅरिकुलर अॅक्टिविटीत प्रसिद्ध आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मुकेश अंबानीचा मुलगा आणि मुलीचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...