आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदने ठेवली \'छोटा राजन\', \'छोटा शकील\' , \'सलीम टेम्पो\' ही नावे, वाचा कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निखाळजे उर्फ छोटा राजन सध्‍या इंडोनेशिया पोलिसांच्‍या ताब्‍यात आहे. मात्र देशाचा मोस्‍ट वॉंटेड गुन्‍हेगार दाऊद इब्राहिमचा पोलिसांना अजुनही पत्‍ता नाही. छोटा राजनचा शत्रू शकील शेख उर्फ छोटा शकीलने दावा केला की, राजनला माझ्यामुळेच अटक झाली आहे. सुत्रांच्‍या माहितीनुसार या दोन्‍ही शत्रूंच्‍या टोपणनावात 'छोटा' हा शब्द आहे. दाऊद इब्राहिमने ही नावे दिली आहेत. divyamarathi.com च्‍या पॅकेजमध्‍ये जाणुन घ्‍या कसे पडले 'छोटा' हे टोपण नाव...
असे मिळाले छोटा शकील नाव
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सर्वात जवळचा सदस्य छोटा शकील याचे मुळ नाव शकील बाबूमियां शेख असे आहे. शकीलच्‍या आधी 'डी' गॅंगमध्‍ये लंबू शकील नावाचा एक सदस्‍य होता. लंबू 'डी' कंपनीचे फायनान्‍स सांभाळत होता. त्‍याच्‍या उंचीमुळे दाऊदने त्‍याला बडा शकील नाव दिले. तर, शकील शेख हा लंबूनंतर गँगमध्‍ये आल्‍याने त्‍याला छोटा शकील असे नाव दिले.
'डी' गँगचा एकनिष्‍ठ कार्यकर्ता
नावात 'छोटा' आहे पण, छोटा शकीलला अंडरवर्ल्डमध्‍ये सर्वात धाडसी सदस्‍य मानले जाते. मुंबईच्‍या एका घटनेत त्‍याने डी गँगशी असलेली निष्‍ठा सिद्ध केली होती. एकदा कस्टम अधिका-यांनी शकीलला तस्‍करीच्‍या गुन्‍ह्यात पकडले होते. मात्र त्‍याने समुद्रात उडी घेऊन प्राण वाचवले. तेथून वाचल्‍यानंतर तो त्‍याच्‍या साथीदारांसोबत पुन्हा त्‍या कस्‍टम अधिका-यांजवळ गेला. सामान परत मागितले. तो वृत्‍तवाहिन्‍यांवर खुलेआम धमक्‍या देतो. अभिनेता संजय दत्त, प्रीति जिंटासह कित्‍येक स्‍टार्ससोबत त्‍याचे जवळचे संबंध आहेत.
दाऊदनेच ठेवले छोटा राजनचे नाव
अंडरवर्ल्ड राजेंद्र सदाशिव निखाळजे याला छोटा राजन हे नाव दाऊद इब्राहिमनेच दिले आहे. निखाळजे बडा राजन सोबत मुंबईच्‍या विक्रोळी परिसरात सिनेमा तिकीटांचा काळा बाजार चालवत होता. पुढे चेंबूरपासून घाटकोपरपर्यंत त्‍याचा प्रभाव मजबूत होऊ लागला. तस्करीच्‍या धंद्यात त्‍यांनी करीम लाला आणि हाजी मस्तान यांनाही टक्‍कर दिली. 1980 दरम्‍यान दोन्‍ही राजनने एक गँग तयार केली. बडा राजन दाऊदचे जमीन-संबंधी वाद सांभाळत होता.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, दाऊद गँगमधील सदस्‍यांची फोटो...