आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know How Traffic Inspector Sujata Patil Saves Cricketer Vinod Kambli\'s Life.

अवघ्‍या 12 मिनिटांत या ट्रॅफिक PI ने वाचवला होता विनोद कांबळीचा प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजाता पाटील. - Divya Marathi
सुजाता पाटील.
मुंबई - माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने 18 जानेवारीला वयाची 44 वर्षे पूर्ण केली. दोन वर्षांपूर्वी वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक सुजाता पाटील यांच्‍यामुळे त्‍याचे प्राण वाचले होते. त्‍याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....
कसा वाचवला प्राण ?
- 29 नाव्‍हेंबर 2013 रोजी सकाळी विनोद कांबळी आपल्‍या चेंबूर येथील घरातून बांद्राकडे निघाला.
- तो स्‍वत: आपली कार चालवत होता. दरम्‍यान, त्‍याला माटुंगा येथे हृदविकाराचा झटका आला.
- त्‍या परिसरात कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता पाटील यांच्‍या निदर्शनास ही बाब आली.
- त्या चौकशीसाठी गाडीजवळ आल्या असता त्यांना कांबळी अस्वस्थ दिसला.
त्यांनी तत्‍काळ कांबळीला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात हलवले.
- वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्‍याने त्‍याचे प्राण वाचले.

केवळ 12 मिनिटांत पोहोचवले रुग्‍णालयात
- परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुजाता यांनी तत्‍काळ कांस्टेबल कुमार दत्ता शेडगे याच्‍या मदतीने विनोदला अवघ्‍या 12 मिनिटांत लीलावती हॉस्पिटलमध्‍ये पोहोचवले.
- यासाठी त्‍यांनी कंट्रोल रुमला फोन करून सायन ते बांद्रादरम्‍यान 7 किलोमीटर वाहतूक थांबवली होती.

पुढील स्‍लाइड्स पाहा, सुजाता यांचे फोटोज...