आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाटे 4 वाजता उघडते मुंबईतील सीक्रेट मार्केट; कवडीमोल किमतीत मिळतात ब्रँडेड वस्तू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऑनलाइन शॉपिंगच्या स्पर्धेत छोट्या दुकानांपासून मॉलचाही टिकाव लागावा यासाठी वेळेचे निर्बंध उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे विधेयक शुक्रवारी विधान परिषदेत मंजूर करण्यात आले.

नव्या तरतुदीनुसार राज्यातील दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, थिएटर, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे आता दिवसरात्र अर्थात 24 तास खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्याला अशाच एका सीक्रेट मार्केटविषयी माहिती घेवून आलो आहे. मार्केट पहाटे 4 वाजता सुरु होते. व्यापारी काही तासांत लाखोंचा व्यवहार करतात. या मार्केटमध्ये  ब्रँडेड वस्तू कवडीमोल किमतीत सहज मिळतात.

पहाटे 4 ते सकाळी 8 सुरु असते मार्केट
- मुंबईतील कामठीपुरा भागात डेढ गल्लीत हा बाजार भरतो.  
- पहाटे 4 वाजता सुरु होणारा बाजार सकाळी 8 वाजता बंद होतो.  
- 1950 मध्ये मार्केटला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.  
- सुरुवातीच्या काळात हा बाजार केवळ शुक्रवारी भरत होता.

या कारणामुळे 'सीक्रेट' आहे हे मार्केट...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईसह परिसरातील छोट्या फॅक्टरीत तयार झालेल्या वस्तू कमी किमतीत उपलब्ध असतात.
- काही व्यापारी ब्रॅंडेड कंपनीतून डिफेक्टेट वस्तू खरेदी करतात. त्या रिपेअर करून सीक्रेट मार्केटमध्ये निम्म्या किमतीत विकतात.

8000 रुपयांचे शूज केवळ 1500 रुपयांत
- मीडिया रिपोर्टनुसार, नाइकvk एअरमॅक्स 2014 स्पोर्ट्स रनिंग शूजची किंमत मार्केटमध्ये 8000 रुपये आहे. तोच शूज सीक्रेट मार्केटमध्ये केवळ 1500 रुपयांत मिळतो.
- कॅट कंपनीचा लेदर शूज केवळ 800 रुपयांत उपलब्ध होतो, त्याची किंमत 8000 रुपये आहे.

कोटींचा टर्नओव्हर
- मार्केटचा एका दिवसाचा टर्नओव्हर 15 ते 20 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. छोट्या शहरातील बिझनेसमन मोठ्या प्रमाणात कमी किमतीत वस्तू खरेदी करतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा... मुंबईतील कामठीपुरा भागात डेढ गल्लीत भरणार्‍या बाजाराचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...