आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12000 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे हा बिझनेसमन; गॅरेजमध्ये उभ्या आहेत लक्झरी कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील टॉप बिझनेसमन सिंघानिया फॅमिली सध्या चर्चेत आहे. रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया यांना मुलगा गौतम सिंघानिया याने घराबाहेर काढल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला आहे. गौतम यांनी वडिलांकडून कार आणि चालकही काढून घेतला आहे. त्यामुळे विजयपत सिंघानियांना पायी फिरावे लागत आहे. ते सध्या भाड्याच्या घरात राहत असल्याचे समजते.

गौतम सिंघानिया यांच्या कॉर्पोरेट लाइफसोबतच त्यांची पर्सनल लाइफही रंजक आहे. लॅव्हिश लाइफस्टाइलमुळे फेसम असलेले गौतम सिंघानियांकडे  लम्बोर्गिनी आणि फरारी (लाफरारी) सारख्या अनेक लक्झरी कार आहेत.

12000 कोटींचा मालक...
- 12000 कोटी रुपयांचा मालक असलेल्या गौतम सिंघानिया यांचा जन्म 9 सप्टेंबर, 1965 रोजी उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या घरात झाला.   
- शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फॅमिली बिझनेसमध्ये लक्ष घातले. 1990 मध्ये रेमंड्स ग्रुपच्या डायरेक्टरपदी त्यांची निवड झाली.  
- 1999 मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर आणि नंतर 2000 मध्ये ते चेअरमन बनले. त्यांनी कोर बिझनेस सारखा सिंथेटिक, सीमेंट आणि स्टील उद्योग विकून फेब्रिक्सवर फोकस केला.

37 मजली आहे जेके हाऊस
- गौतम सिंघानिया यांचे जेके हाऊस मुंबईच्या ब्रीचकँडीवर स्थित आहे. तथापि, हा देशातील दुसरा सर्वात मोठा बंगला आहे.
- 2012 मध्ये या घराचे कन्स्ट्रक्शन सुरू झाले. परंतु 2013 मध्ये यावर रोख लावण्यात आली होती.
- जेथे सिंघानिया मॅन्शन बनत आहे, त्याच जागी अगोदर रेमंडचे शोरूम बनत होते.
- हे हाऊस 1 एकराच्या भूखंडावर उभारलेले आहे. या जमिनीवर पूर्वीपासूनच सिंघानिया फॅमिलीचा 1960 मध्ये बनलेला ग्राउंड प्लस टू बंगला आहे.
- नव्या बिल्डिंगमध्ये बेसमेंट प्लस स्टिल्ट्स, पहल्या आणि दुसऱ्या फ्लोरवर दुकान, तिसऱ्या आणि 14व्या फ्लोरदरम्यान पार्किंग आणि दोन रिफ्युज फ्लोर (म्हणजे अशी जागा, ज्यात एखादा आपत्तीत घरातील लोक मदत मिळेपर्यंत थांबू शकतील. 12 मजल्यांपेक्षा मोठ्या इमारतींत अशी जागा असणे अनिवार्य आहे.) आहेत.
- 15व्या ते 18व्या फ्लोरदरम्यान एक म्युझियम आहे. 19व्या फ्लोअरवर सर्व्हिस एरिया आहे, तर 20व्या फ्लोअरपासून ते 36व्या फ्लोअरपर्यंत निवास, रिफ्युज एरिया आणि इतर सुविधांबरोबरच एसी प्लांट रूम आहे.

अशी आहे सिंघानिया फॅमिली
- सिंघानिया फॅमिली रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया आहेत. गौतम यांचा जन्म 9 सप्टेंबर 1965 रोजी झाला.
- त्यांच्या वडिलांचे नाव विजयपत सिंघानिया आणि आईचे नाव आशाबाई सिंघानिया आहे.

प्रायव्हेट जेट आणि याटचा आहे शौक
- गौतम सिंघानिया देशाच्या त्या निवडक बिझनेसमनपैकी आहेत, ज्यांच्याकडे प्रायव्हेट जेट आणि याट आहे.
- त्यांच्याकडे दोन याट मूनरॅकर (Moonracker) आणि अशिना (Ashena) आहे. Moonracker मार्केटमध्ये उपलब्ध सर्वात महागडी याट आहे.
- दुसरीकडे, अशिना गुजरातच्या जंगलांतून तब्बल 568 वृक्ष कापून तेथील स्थानिक कारागिरांनी बनवली.
- एवढ्या मोठ्या संख्येने वृक्षतोड झाल्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईलाही तोंड द्यावे लागले.
- सिंघानिया यांच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये फेरारी 458, लोटस एलिस, होन्डा एस 2000 आणि लॅम्बोर्गिनी अशा कारचा समावेश आहे.

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, संबंधित PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...