आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोदासोबतच अश्लिल शब्द, शिव्यांमुळे फेमस आहे हा कॉमेडियन; नरेंद्र मोदींची उडवली खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टि्वटरवर खिल्ली उडवल्याने (एआयबी) म्हणजेच ऑल इंडिया बॅकछोड या कॉमेडी  शोविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रितेश माहेश्वरी यांनी तक्रार दिली आहे.  एआयबीने गुरुवारी मोदी यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो टि्वटरवर शेअर केला.
 
त्यानंतर मोदींच्या खऱ्या फोटोवर स्नॅपचॅटवरच ‘डॉगी फिल्टर’ लावून फोटोची खिल्ली उडवली. यानंतर काही जणांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर एआयबीने हा फोटो टि्वटरवरून हटवला. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन कॉमेडी शोविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही या शोमध्ये लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गजांची खिल्ली उडवण्यात आली होती.

काय म्हणला को-फाउंडर..?
एआबी ग्रुपचा को-फाउंडर तन्मय भट्ट म्हणाली की, 'आम्ही जोक्स बनवतो. त्यातून करमणूक करणे आमचा उद्देश आहे. भविष्यातही आम्ही जोक्स बनवत राहाणार. पण गरज भासल्यास आम्ही माफी मागूण ते डिलीटही करतो. कोण काय विचार करतो, याची आम्ही चिंता करत बसत नाही.' 

दरम्यान, तन्मय भट्ट याने यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर आणि लता मंगेशकर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.  विनोदासोबत अश्लिल शब्द आणि शिव्यांमुळे एआयबी ग्रुप चर्चेत आहे.

कोण आहे तन्मय भट्ट?
- तन्मय भट्ट एक स्टँडअप कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, प्रोडयूसर आणि एआयबी रोस्टचा को-फाउंडर आहे. तो मुंबईत राहातो.
- तन्मयने मुंबईतील सेठ चुन्नीलाल दामोदरदास बर्फीवाला स्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेतले आहे. नंतर त्याने दिल्ली यूनिव्हर्सिटीतून उच्चपदवी प्राप्त केली आहे.
- 'लोकल हीरोज' शोच्या माध्यमातून तन्मय सुरुवातीला चर्चेत आला होता.
- टॉप-10 कॉमिक करेक्टरमध्ये सहभागी झाल्यानंतर तन्मय यूनाइटेड किंगडमचा कॉमेडी शो 'बेस्ट इन स्टँडअप'मध्ये दिसला होता.
- तन्मयने मि‍त्र गुरसिमरनजीत खंबा याच्यासोबत 'ऑल इंडिया बी' (एआयबी) कॉमेडी ग्रुप सुरु केला आहे. या शोचा तो स्क्रिप्ट रायटर आणि डायरेक्टर आहे.

काय आहे एआयबी रोस्ट?
- एआयबी रोस्ट हा देशातील असा पहिला शो आहे की, त्या गेस्टला अपमान सहन करावा लागतो. त्याची धम्माल खिल्ली उडवली जाते.
- या शोमध्ये गेस्टची हलकी-फुलकी थट्टा सोबतच त्याला अश्ली शब्द आणि शिव्यांनाेही सामोरे जावे लागते.
- एआयबीचा इंटरनेटवर चांगलाच बोलबाला आहे. यूट्यूबवर तर याचे लाखो फॉलोअर आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा... कॉमेडी किंग तन्मय भट्ट याचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...