आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी होती न्यूज चॅनेलमध्ये इन्टर्न, आज आहे 48 हजार कोटींच्या कंपनीची CEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोशनी शिव नादर फाउंडेशनचेही काम पाहते. - Divya Marathi
रोशनी शिव नादर फाउंडेशनचेही काम पाहते.
मुंबई- एचसीएलची सीईओ रोशनी नादर मल्होत्रा हिचा फोर्ब्सच्या जागतिक 100 सर्वात पॉवरफुल महिलांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. रोशनीसह या यादीत 5 भारतीय महिलांचा समावेश आहे. रोशनीचे रॅंकिंग 57th आहे. भारतीय महिलांमध्ये सर्वात जास्त रॅंकिंग चंदा कोचर यांना मिळाले आहे. जर्मनीची चान्सलर अॅंगेजा मर्केल या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. 48 हजार कोटी रुपयांच्या कंपनीची सीईओ रोशनी कधी एका न्यूज चॅनेलमध्ये काम करायची. वयाच्या 28 व्या वर्षी बनली सीईओ....
 
- 36 वर्षीय रोशनी 2009 मध्ये फक्त वयाच्या 28 व्या वर्षी आयटी कंपनी एचसीएलची सीईओ बनली. त्याच वर्षी ती कॉरपोरेशनमध्ये एक्जीक्यूटिव डायरेक्टर बनली होती. 
- टेक्नॉलॉजी, हेल्थकेयर आणि इन्फोसिस्टमचे काम करणारी एचसीएलची वॅल्यू सुमारे 48 हजार कोटी रुपये इतके आहे. या कंपनीचे सर्व स्ट्रॅटजिक निर्णय घेते.  
- ती शिव नादर फाउंडेशनची ट्रस्टी सुद्धा आहे. ज्याचा फोकस एज्यूकेशनवर आहे. या फाउंडेशनने भारतात काही टॉप कॉलेज आणि स्कूल्स स्थापन केले आहेत. 
- रोशनीने शिखर मल्होत्रासोबत लग्न केले आहे आणि त्यांना एक मुलगा आहे. तिचा पती तिला शिव नादर फाउंडेशनच्या कामात मदत करतो.
 
एका परदेशी न्यूज चॅनेलमध्ये केले आहे काम-
 
- शिव नादरची एकुलती एक मुलगी रोशनी नादरचे शिक्षण दिल्लीत झाले आहे. रोशनीने यानंतर मीडियात आपले ग्रॅज्यूएशन नॉर्थवेस्टर्न यूनिवर्सिटीतून केले. या दरम्यान तिने सीएनबीसी चॅनेलमध्ये इन्टर्न म्हणून काम केले. 
- ग्रॅज्यूएशननंतर तिने स्काय न्यूजच्या लंडन ऑफिसमध्ये काम केले. यानंतर आपल्या पित्याच्या आदेशानुसार ती नोकरी सोडली. 
- यानंतर तिने केल्लोग ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून सोशल इंटरप्राईज मॅनेजमेंट एंड स्ट्रेटजीमधून एमबीए केले. 
- ऑक्टोबर 2008 मध्ये रोशनी परदेशातून भारतात परतली आणि आपल्या वडिलांची कंपनी एचसीएल कॉर्पोरेशनसोबत जोडली गेली.
 
 पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रोशनी नादरचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...