आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका छोट्या गॅरेजमध्ये सुरु केली कंपनी, आज आहे 15 हजार कोटींची मालकीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बायोकॉनची फाउंडर चेयरपर्सन किरण शॉ मुझूमदार.... - Divya Marathi
बायोकॉनची फाउंडर चेयरपर्सन किरण शॉ मुझूमदार....
मुंबई- 2017 मध्ये जगातील पावरफुल महिलांच्या पाच भारतीयांनी आपले स्थान पटकावले आहे.  फोर्ब्स द्वारा जारी करण्यात आलेल्या या यादीत औषध कंपनी बायोकॉनची फाउंडर चेयरपर्सन किरण मजूमदार शॉ यांना 71 वा नंबर मिळाला आहे. बायोकॉनची मालकीण किरण मजूमदार शॉ यांचे ऊंच शिखरालर जाणे एखाद्या परिकथेला कमी नाही. फक्त 10 हजार रुपयात एका गॅरेजमध्ये सुरु केलेली ही कंपनी बायोकॉन कंपनी आज 14.9 हजार कोटी रुपयांची कंपनी बनली आहे. लोकांनी म्हटले महिला नाही करू शकत काम....
 
- जीवशास्त्रात बॅचलर डिग्री घेतल्यानंतर किरणने मेलबॉर्न, ऑस्ट्रेलियातील ब्रूविंगमधून डिग्री घेतली. त्यांनी चार वर्षापर्यंत कार्लटन एंड यूनायटेड ब्रूवरीजमध्ये ट्रेनी ब्रूवर (ब्रूवर म्हणजेच दारू बनविणारी) म्हणून काम केले. यानंतर त्यांनी कोलकातात टेक्निकल कन्सल्टंट म्हणून काम पाहिले.  
- किरणने बंगलुरु किंवा दिल्लीत जॉब करायचा विचार केला. दोन्ही कंपन्यांनी हे म्हणून नकार दिला की ब्रूवरचे काम महिला नव्हे पुरूष करतात.  त्या काळात भारतात दारू कंपन्या महिलांना ब्रू-मास्टर म्हणून नोकरी देत नव्हत्या.
 
किरण आणि विजय माल्याचे कनेक्शन-
 
- किरणचे पिता रसेंद्र मजूमदार बंगळुरुमध्ये विजय माल्याचे वडिल विठ्ठल माल्यांच्या यूनायटेड ब्रूवरीजमध्ये चीफ ब्रूमास्टर होते.
- एवढेच नव्हे तर दोघे शेजारीच राहायचे. किरण आणि विजय माल्या खूपच चांगले मित्र होते. हे सर्व असूनही किरण यांना माल्याच्या कंपनीत ब्रू-मास्टर म्हणून जॉब देण्यास नकार देण्यात आला.
- रिटायरमेंटनंतर पिता रसेंद्र मजूमदार यांनी बडोद्यात मॉल्टिंग कंपनी खोलली. किरण वडिलांच्या कंपनीत रूजू होणार तेच आयरिश एंटरप्रन्योर लेस ऑचिंक्लॉसने त्यांना बोलावले.
 
ट्रेनी मॅनेजर म्हणून काम सुरू- 
 
- ऑचिंक्लॉस यांनी किरण यांना एक बिजनेस सुरु करण्याचा प्रस्ताव दिला. किरण आधी यासाठी तयार नव्हत्या. यावर किरण यांनी अट ठेवली की, जर 6 महिन्यात माझे काम पसंत नाही आले तर ब्रू-मास्टर म्हणून एखाद्या कंपनीत काम मिळवून द्यावे लागेल. 
- ऑचिंक्लॉसने आश्वत केले की, 'तू फक्त एक वर्षासाठी हे काम कर. त्यानंतरही काम पसंद आले नाही तर तूला मी स्कॉटलंडच्या कंपनीत किंवा इंग्लंडमधील दुस-या कंपनीत में नोकरी मिळवून देईन. 
- यानंतर किरणने आर्यलंडमध्ये बायोकॉन बॉयो केमिकल्स लिमिटेडमध्ये ट्रेनी मॅनेजर म्हणून काम सुरु केले. 
 
एका गॅरेजमध्ये सुरू केली कंपनी-
 
- काही काळ तेथे काम केल्यानंतर किरण भारतात परतली. ती आपली कंपनी सुरु करण्याचा विचार करत होती पण त्या काळात बायोटेक्नोलॉजी हा विषय एकदम नवा होता. या नव्या विषयातील कंपनीला बॅंका लोन देत नव्हत्या. एवढेच नव्हे तर किरण या वुमन एंटरप्रन्योर असल्या कारणाने त्यांच्यावर कोणीच भरवसा ठेवता नव्हता.
- यानंतर किरण यांनी 1978 मध्ये आर्यलंडच्या बायोकॉन बायोकेमिकल्स लिमिटेडसोबत पार्टनरशीपमध्ये कंपनीची स्थापना केली. त्यावेळी केवळ 10 हजार रुपयांत एका गॅरेजमध्ये त्यांनी आपली कंपनी सुरू केली होती.
- या कंपनीत तिचा पहिलाा कर्मचारी एक रिटायर गॅरेज मॅकेनिक होता. सर्वात पहिले कंपनीने काम सुरु केले ते म्हणजे पपईच्या रसापासून एन्जायम बनविण्याचे. पुढे जाऊन हीच कंपनी इंटीग्रेटेड बायोफार्मास्यूटिकल कंपनीत बदलली.
- त्याची कंपनी आशियातील सर्वात मोठी इन्सुलिन प्रोड्यूसर आहे. याशिवाय कंपनीची मलेशियातील जोहरमध्ये एक फॅक्ट्री आहे. 
 
फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान-
 
- किरण मजुमदार-शॉ यांना फ्रान्स सरकारच्या वतीने त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘नाइट ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 
- बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान, समर्पण, संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...