आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्झरी लाईफ जगतो \'भारत माता की जय\' न म्हणणारा आमदार, क्रिकेटचाही शौकीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वारिस पटाण यांना हेलिकॉप्टर उडविण्याचा छंद आहे. - Divya Marathi
वारिस पटाण यांना हेलिकॉप्टर उडविण्याचा छंद आहे.
मुंबई- 'भारत माता की जय' म्हणणार नाही असे वक्तव्य केल्याने विधानसभेतून निलंबित केलेले वारिस पठाण असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पार्टीच्या तिकीटावर निवडून आले आहेत. 2014 साली मुंबईतील विधानसभा निवडणुकीत जिंकताच चर्चेत आलेले पठाण यांना क्रिकेट खेळण्यासोबतच देश-विदेशात फिरणे खूपच पसंत आहे.
कोण आहेत वारिस पठाण...
- मुंबईतील भायखळा मतदारसंघात वारिस युसुफ पठाण (47) यांनी भाजपचे मधु चव्हाण यांचा पराभव करीत प्रथमच विधानसभेत प्रवेश केला.
- व्यावसायाने वकील असलेले पठाण यांचा जन्म वांद्रेत झाला. त्यांचे वडिल एक ट्रायल जज होते.
- वारिस मागील 23 वर्षापासून एक क्रिमिनल लॉयर म्हणून प्रॅक्टिस करीत आहेत.
- पठाण यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
- ते 2002 मधील अभिनेता सलमानच्या खानच्या 'हिट अॅंड रन' केस प्रकरणात वकिल राहिले आहेत.
- वांद्रेतील टोनी वाटर फील्ड रोडवरील पॉश रेसिडीन्सल कॉम्पलेक्समध्ये राहणारे पठाण बड्या पार्ट्या आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
अनेक आंदोलनात केले नेतृत्व-
- एमआयएमसोबत जोडल्यनंतर वारिस पठाण यांनी मुंबईत पक्षाच्या वतीने अनेक आंदोलनाचे नेतृत्त्व केले. त्यामुळे त्यांना तुरुंगातही जावे लागले होते.
- वारिस पठाण यांनी महाराष्‍ट्रात लागू केलेल्या बीफ बंदीविरोधात मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते.
- गोहत्या बंदीविरोधातही त्यांनी लढा दिला आहे.
- मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या तरूणांची केस पठाण लढवित आहेत.
- मुस्लिम युवकांवर होणा-या अन्यायाविरोधात पठाण आवाज उठवत आले आहेत.
क्रिकेट खेळणे व फिरायला जाणे वारिस यांचा छंद-
- आमदार वारिस पठाण यांना क्रिकेटचा खूपच छंद आहे.
- आमदार झाल्यानंतरही ते मैदानात क्रिकेट खेळताना दिसतात.
- ते नेहमीच आपल्या परिसरात क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करतात.
- याशिवाय बाईक चालवणे, हेलिकॉप्टर उडवणे आणि पार्टीज ऑर्गनाईज करणे त्यांना आवडते.
- पठाण यांना देश-विदेशात फिरायला जाणे आवडते. ते वर्षातून एकदा विदेशात फिरायला जातात.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आमदार वारिस पठाण यांची निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...