आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know More About Mumtaj Kazi Asia First Diesel Locomotive Train Driver.

ही आहे देशातील पहिली महिला ट्रेन चालक, आता चालवणार AC ट्रेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुमताज काझी गेल्या 25 वर्षापासून ट्रेन चालवतात. - Divya Marathi
मुमताज काझी गेल्या 25 वर्षापासून ट्रेन चालवतात.
मुंबई- देशातील पहिल्या एसी (एयरकंडिशन्ड) लोकल ट्रेनची ट्रायल उद्यापासून (16 एप्रिल) सुरु होत आहे. ही ट्रायल हार्बर मार्गावर होत आहे. या ट्रेनला चालविण्याची जबाबदारी एका महिला लोकोमोटिव ड्रायवरकडे सोपविली जाऊ शकते. ही महिला आशियातील पहिली डिझेल लोकोमोटिव ड्रायवर आहे. मुमताज काझी असे त्यांचे नाव आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून मुमताज चेन्नईहून दाखल झालेल्या एसी ट्रेनच्या इंजिनचा व इतर बाबींची माहिती घेत आहेत. त्यामुळेच मुमताजच या गाडी चालवतील असा कयास बांधला जात आहे. तर आज आपण पाहूया कोण आहेत या मुमताज काझी...
असे सुरु झाले करियर...
- मुंबईत राहणारी 45 वर्षीय मुमताज काझी दोन मुलांची आई आहे. त्या मुंबई सीएसटी ते पनवेल या मार्गावर लोकल ट्रेन चालवतात.
- मुमताज यांचे वडिल चर्चगेट स्टेशनवर ट्रंक सुपरिटेंडेंट होते. त्यांचे अनेक मित्र मोटरमन होते.
- ते नेहमीच आपल्या मित्रांचे अनुभव आपली मुलगी मुमताजला सांगायचे.
- हे अनुभव मुमताजला खूप आवडायचे. मुमताजला लहानपणापासूनच वेगाचे वेड आहे.
- 12 वी नंतर मुमताजने मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठातून मेडिकल लॅबरोटरीत डिप्लोमा केला.
- 1998 मध्ये त्यांनी मोटरमन पदासाठी अर्ज केला. तसेच त्या स्वात जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या.
- मुमताज 50 पुरुषांच्या बॅचमध्ये एकमेव महिला होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांना 3500 रुपये मिळत असत.
पहिली महिला ट्रेन ड्रायवर
- मुमताज यांनी आपले करिअर सप्टेंबर 1991 मध्ये एक डिझेल लोकोमोटिव अस्सिटेंट ड्रायवर म्हणून सुरु केले.
- त्या केवळ भारतीय रेल्वेच्या नव्हे तर आशियातील पहिल्या महिला डिझेल लोको पायलट ठरल्या.
- 1995 मध्ये त्यांचे नाव 'लिम्का बुक ऑफ रिकार्ड्स' मध्ये नोंदवले गेले. त्या मागील 25 वर्षापासून ट्रेन चालवत आहेत.
- मुमताज अशा पहिल्या महिला ट्रेन चालक आहेत जया वीजेवर आणि डिझेल इंजिनवर ड्रायव्हिंग करू शकतात.
- आपल्या ड्रायव्हिंग करिअरच्या सुरुवातीच्या काळात मुमताज यांना शंटिंग, कपलिंग यासारखी जड कामे करावी लागली. जी फक्त पुरुष मंडळी करीत असे.
घरही सांभाळावे लागते
- अनेक डब्ब्यांची ट्रेन संभाळणा-या मुमताज यांनी आपले घरही तेवढेच सहज चालवतात.
- मुमताज सांगतात की, रेल्वे ड्रायवर होण्यासाठी फक्त तांत्रिक ज्ञान नव्हे तर योग्य जजमेंट, समयसुचकता, शारीरिक क्षमता, कस याची गरज असते.
- मुमताजला या कामासाठी केवळ रेल्वेनेच नव्हे तर देशातील अनेक सामाजिक संस्थांनी गौरविले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आशियातील पहिली महिला डिझेल ट्रेन ड्रायवर मुमताज काझींचे PHOTOS...