आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबु सलेमच्या आवाजाची दीवानी होती ही बॉलिवूड अॅक्ट्रेस; सध्या अशी एन्जॉय करतेय लाइफ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई शहराला हादरवून सोडणार्‍या 12 मार्च 1993 रोजीच्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष टाडा कोर्टाने अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमसह सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. कोर्टाने एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह शेखला दोषी ठरवले असून अब्दुल्ल कय्यूम याची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

एकेकाळी ड्रायव्हर अबू सलेमचे नाव बॉलिवूड अॅक्ट्रेस मोनिका बेदीसोबत जोडले गेले होते. दोघांनी विवाह केल्याचे वृत्तही समोर आले होते. मात्र, मोनिकाकडून या वृत्ताला आजपर्यंत दुजोरा मिळू शकलेला नाही.

अबु सलेमच्या आवाजाची दिवानी होती मोनिका..
- 1998 मध्ये अबू सलेम यांनी दुबईत स्वत:चा किंग्स ऑफ कार ट्रेडिंगचा बिझनेस सुरु केला होता. मोनिकाचे  फिल्मी करियर डायरेक्टर मुकेश दुग्गल यांचा सिनेमा 'सुरक्षा'ने सुरु झाले होते.
- तेव्हा मुकेश दुग्गल आणि सलेम चांगले मित्र समजले जात होते. दुबईच्या एका बॉलिवूड पार्टीत सलेम आणि  मोनिकाची भेट झाली होती. दोघांमधील प्रेमसंबंधही जगजाहीर आहे.
- मोनिकाने अनेकदा इंटरव्ह्यूमध्ये सलेमसोबत प्रेमसंबंध असल्याचे जाहीर केले होते. सालेमचा आवाज आवडत असल्याचे मोनिकाने म्हटले होते.
- अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. इतकेच नाही तर अबू सलेम याने मोनिकाला कायदेशीर नोटीसही बजावली होती. "या तो मुझे पति कहो, या मुझे तलाक दे दो।", असे सालेम याने नोटिशीत म्हटले होते.
- 4 जुलै 2007 रोजी लिस्बनमध्ये सालेमसह मोनिकाला अटक करण्यात आली होती.

सध्या मोनिका अशी एन्जॉय करतेय लाइफ
- 5 वर्षे तुरुंगाचा हवा खाल्ल्या नंतर मोनिकाने रिएलिटी टीव्ही शो 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री केली होती.
- 2013 मध्ये ती सरस्वतीचंद्र आणि 2015 मध्ये 'बंधन' मालिकेत दिसली होती.
- मोनिका बेदी लवकरच 'लाइफ ओके' चॅनलवर येणारी मालिका 'मासूम'मध्ये दिसणार आहे. तिने या मालिकेत निगेटिव्ह रोल केला आहे.

पुढील स्लाइड्स पाहा मोनिका बेदीचे ग्लॅमरस फोटोज..
बातम्या आणखी आहेत...