आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Knowledge Economy, Skill Development To Be Focus Of Maharashtra Budget

कृषी, सिंचन, रोजगारवाढ शिक्षणावर भर : अर्थमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्थसंकल्पात केवळ कर वाढवून राज्याच्या महसुलात वाढ होत नाही. त्यामुळे जास्त महसूल मिळवून देणार्‍या उपक्रमांवर भर देणे आवश्यक आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, कौशल्य आधारित शिक्षण रोजगारावर भर देणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘आघाडी सरकारने गेल्या पंधरा वर्षात सरकारची तिजोरी रिकामी केली असून राज्याच्या डोक्यावर तीन लाख ७०० कोटींचे कर्ज आहे. पैसे नसल्याने अनेक प्रकल्प रखडले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी महसूल वाढीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी आमचे सरकार पावले उचलत आहे,’ असेही ते म्हणाले.