आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kokan Ground Report: Not Well Environment To Narayan Rane In Kokan, Divya Marathi

कोकणचा ग्राउंड रिपोर्ट: धाकदपटशा करणारे नारायण राणेंवर आता ‘हात’ जोडण्याची वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तळकोकणात पुन्हा भगवामय वातावरण असून रायगडमध्ये राष्ट्रवादीला फटका, तर शेकापला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोंडी करून कोकणातच राणेंच्या दुर्दैवाचे दशावतार!
सिंधुदुर्ग (३ जागा): कोकणचे आपण एकमेव सम्राट असल्याचा दावा करणारे काँग्रेसचे नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवत असून त्यांच्यसमोर शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. युती फुटण्यापूर्वी आणि आघाडी तुटण्यापूर्वी राणेंचे काही खरे नाही, असेच स्पष्ट दिसत होते. लोकससभेचेच चित्र विधानसभेत दिसू लागल्याने आता राणे जिल्ह्यातच मुक्काम ठोकून आपल्या तसेच धाकटे चिरंजीव नितेश राणे यांच्या विजयासाठी लोकांच्या दारी जाऊन हात जोडत आहेत. ठोकशाहीवर विश्वास असणा-या राणेंना अखेर लोकशाही मानावी लागली. १९९० नंतर आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर गेल्या २५ वर्षांत राणेंना निवडणूक जिंकण्यासाठी इतके दयनीय कधी व्हावे लागले नव्हते. राणे व वैभव नाईक अशी सरळ लढत असती तर नाईक यांनी बाजी मारली असती. या भागात लोकसभेत ३० हजारांची आघाडी शिवसेनेच्या विनायक राऊत यांना मिळाली होती. प्रचंड जनसंपर्क आणि मातोश्रीचा संपादन केलेला विश्वास याच्या जोरावर नाईक यांचे नाव घरोघरी पोहोचले आहे. यामुळे काँग्रसचे प्रचारप्रमुख असूनही राणेंवर आपल्या विजयासाठी आणि मुलासाठी कोकणातच अडकून पडण्याची वेळ आली. राष्ट्रवादीचे पुष्पसेन सावंत तसेच भाजपचे विष्णू मोंडकर हे राणे विरोधातील मते मिळवणार असल्याने त्याचा राणेंना फायदा झाला तरच त्यांना विजय मिळू शकतो. अन्यथा राणेंचा मानहानीकारक पराभव होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीला धक्का मात्र शेकापचा विजय पक्का !
रायगड (७ जागा) : अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या सुनील तटकरे यांनी पदाधिका-यांची तसेच कार्यकर्त्यांची इच्छा नसतानाही जिल्ह्यातील शत्रू शेकापला त्यांनी जवळ केले. सत्तेसाठी काहीही करू शकणा-या शेकापच्या भाई जयंत पाटील यांनीही गेली पाच वर्षे तटकरेंच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठवले. मात्र या निर्णयाने शेकापचे कट्टर कार्यकर्ते नाराज तर तटकरेंबरोबर काम करणारे निष्ठावंत राष्ट्रवादी पदाधिकारी त्यांना सोडून गेले आहेत. मात्र जयंत पाटील व तटकरेंना त्याचे काही घेणेदेणे नाही. ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला म्हणून ढोल बडवत आणि जिल्हा परिषदेत सत्तेच्या तुकड्यासाठी केला झोल अशी प्रचाराची राळ शिवसेनेकडून उठवण्यात आली आहे. त्यामुळे श्रीवर्धन व कर्जत या दोन मतदारसंघात शिवसेना विजयाच्या जवळपास आली आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता मिळवण्यासाठी शेकापने राष्ट्रवादीची मदत घेतली. आता ते जिल्हा परिषदेवर तर आहेतच, पण आता विधानसभेतही किमान तीन आमदार त्यांचे दिसतील, अशी चिन्हे आहेत. पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसबरोबरची चूल मोडून भाजपबरोबर संसार थाटला आहे. या ठिकाणी शेकापच्या बळीराम पाटील यांनी राष्ट्रवादीच्या मदतीने ठाकूर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. मात्र वैयक्तिक प्रभाव, प्रचंड पैसा याच्या जोरावर ठाकूर निसटता विजय मिळवू शकतात. तर महाडमध्ये शिवसेनेच्या भरत गोगावले निवडून येऊ शकतात.

सावंतवाडीसह कणकवलीत प्रचंड चुरस
सावंतवाडीत शिवसेनेच्या दीपक केसरकर यांना एकेकाळच्या राणे समर्थक परशुराम उपरकर तसेच राजन तेलींनी आव्हान दिले आहे. उपरकर मनसे, तर तेली भाजपकडून मतांचा जोगवा मागत आहेत. यात केसरकर निसटून जातील, असे दिसते. सावंतवाडीप्रमाणे कणकवलीतही पंचरंगी मुकाबला आहे. भाजपचे प्रमोद जठार विरुद्ध नितेश राणे असा सरळ मुकाबला असता तर जठार निवडून आले असते. पण शिवसेनेचे सुभाष मयेकर, काँग्रेसचे विजय सावंत रिंगणात असल्याने मतांची विभागणी होऊन जठारांना गतवेळेप्रमाणे निसटत्या विजयाची संधी आहे.

पुढे वाचा रत्नागिरीत शिवसेनाच