आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur Toll Plaza Will Shut Down Before 1st December Chandrakant Patil

कोल्हापूरचा टोल 30 नोव्हेंबरपूर्वी बंद करणार- चंद्रकात पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोल्हापूर शहरातील टोल रद्द झाल्याची अधिसूचना लवकरच काढू. हा टोल 30 नोव्हेंबरपूर्वी बंद झालेला असेल. याबाबतची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकामंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आयआरबीला देय रक्कम देण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरचा टोल कायमचा रद्द करण्याबाबत राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने या प्रकल्पाचे मूल्यांकन केले आहे. या समितीने केलेल्या मूल्यांकनाला आयआरबी कंपनीने मान्यता दिलेली नाही. या मूल्यांकनापेक्षा अधिक खर्च झाल्याचा दावा आयआरबीने केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आयआरबीचे देय रक्कम ठरवण्याचे काम सुरु आहे. राज्य सरकारच्या समितीने कोल्हापूर टोलचा खर्च व व्याजाची रक्कम सुमारे 360 कोटींपर्यत असल्याचे म्हटले आहे तर आयआरबी 470 कोटींपेक्षा अधिक खर्च झाल्याचे सांगत आहे. समिती व कंपनी यांच्यात सुमारे 110 कोटी रूपयांची तफावत दिसून येत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होत आहे. या बैठकीत यातून मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे. एक डिसेंबरपूर्वीच टोल रद्दची अधिसूचना काढली जाणार आहे.
टोल रद्द केला जाणार असल्याने राज्य सरकारने टोल वसुलीला तीन महिन्यांची स्थगिती दिली आहे. या स्थगितीची मुदत येत्या 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी सरकारने अधिसूचना काढली नाही तर टोल वसुल करण्याचा आयआरबीचा मार्ग मोकळा होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे सरकारला तत्काळ हालचाली कराव्या लागणार आहेत.