मुंबई- रेल्वेचे जेवण म्हटले की प्रवासी लगेच तोंड वाकडे करतात. त्यामागे असलेली कारणेही रास्त आहेत. पण यावर आता रेल्वे प्रशासनाने उत्तम तोडगा काढला आहे. रेल्वेत आता तुम्हाला घरचा डबा मिळणार आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे. त्यासाठी कुडाळ आणि सावंतवाडी या रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना आयआरसीटीसीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर ए. के. मनोचा यांनी सांगितले, की प्रयोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी आम्ही नाबार्डसोबत भागिदारीचा करार केला आहे. स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यातून या बचत गटांना रोजगार मिळेल आणि रेल्वेच्या प्रवाशांना घरच्या डब्याचा आनंद लुटता येईल.
मनोचा यांनी सांगितले, की यापूर्वी केरळमध्ये अशा स्वरुपाचा प्रकल्प राबवण्यात आला होता. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. आता कुडाळ आणि सावंतवाडीत असा प्रयोग केला जाईल. त्यानंतर देशभरात अंमलबजावणी केली जाईल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, कशी काम करेल 'घरच्या डब्या'ची यंत्रणा... कसे मागवता येतील डबे....