आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्रातील हे सुंदर समुद्र किनारे आपल्‍याला वेड लावतील, पाहा 14 फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोकणाला महाराष्ट्रातील 720 किलोमीटरची अरुंद अशी किनारपट्टी लाभली आहे. पश्चिमेस अरबी समुद्र तर, पूर्वेला समांतर अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. येथील जैवविविधता, परंपरा, पाककृती आणि भाषांमध्ये कोकणाचे वेगळेपण आहे. उत्तरेकडील बोर्डीपासून ते दक्षिणेकडील शिरोडा पर्यंत पसरलेला कोकणचा महाराष्ट्रातील समुद्रकिनारा विस्मयकारक नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. या संग्रहात पाहुया कोकणातील सुंदर समुद्र किनारे..
किना-यावर वसलेली सुंदर शहरं..
कोकणातील किनाऱ्यावर वसलेली रत्नागिरी– गणपतीपुळेसारखी सुंदर शहरेदेखील येथे पाहायला मिळतील. तुम्हाला जर, छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्याची शक्ती तुम्हाला अनुभवायची असेल, तर मालवणच्या किनाऱ्यावर उभा असणारा सिंधुदुर्ग किल्ला पाहाच. साहसी खेळांची आवड असणा-यांसाठी सिंधुदुर्गात स्नॉर्कलिंग- स्कुबा डायव्हिंगसारख्या संधी उपलब्ध आहेत.
कोकणातील समुद्र किनारे तुम्‍हाला फिरायचे असतील तर, रत्नागिरी हे तळ ठोकण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. हापूस आंबे, नारळ, फणस आणि 15 व्या् शतकातील किल्याची पार्श्वभूमी असलेले वाळूचे सागरी किनारे यासाठी हे बंदराचे शहर प्रसिद्ध आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहू, असेच काही सुंदर समुद्र किनारे..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...