आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृपाशंकरांना हटवल्याने काँग्रेसमध्येच ‘सेलिब्रेशन’

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा रविवारी रात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘वर्षा’ बंगल्यावर सत्कार करण्यात आला. या वेळी प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा सल्ला त्यांनी नूतन नगरसेवकांना दिला. दरम्यान, कॉँग्रेसमधील कृपाशंकर सिंह यांच्या विरोधी गटाचे नगरसेवक मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवूून गोरेगाव येथील गार्डन रेस्टॉरंटमध्ये पार्टी करीत होते. कृपाशंकर सिंह यांना मुंबई अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ ही पार्टी आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नूतन नगरसेवकांचा सत्कार आणि चहापानाचा कार्यक्रम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी आयोजित केला होता. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, उगाच विरोधाला विरोध करू नका. जेथे खरोखर गरज आहे अशाच ठिकाणी धारदारपणे विरोध केला जावा. नकारात्मक कामापेक्षा सकारात्मक काम करा आणि चांगल्या कामांना पाठिंबाही द्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच महापालिकेत गटनेते म्हणून चौथ्यांदा निवडून आलेले सुरेश कोपरकर आणि उपनेता म्हणून तिस-यांदा निवडून आलेल्या शीतल म्हात्रे यांची निवड करण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला.