आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, 2 गोविंदाचा पडून मृत्यू, 197 जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुप्रीम कोर्टाने दहीहंडीवरील बंदी उठवल्यानंतर सर्वत्र गोविंदांचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचून हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाले आहेत. मात्र, दरवर्षाप्रमाणे यंदाही  दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे.

पालघरमध्ये दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृ्त्यू झाला आहे. रोहन गोपिनाथ किणी (वय-21) असे मृत गोविंदाचे नाव आहे. थरावर चढल्यानंतर रोहनला फिट येऊन तो खाली कोसळला.
धनसारमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.  रोहनला तातडीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उपचार सुरु करण्‍यापूर्वीच रोहनची प्राणज्योत मालवली. रोहन वरच्या थरावरून दहीहंडी फोडत असतानाच त्याला फिट आल्याने तो खाली पडला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करीत आहेत.

46 हून जास्त गोविंदा जखमी
दहीहंडीचा जल्लोष असून उंच थर रचण्याच्या नादात अनेक गोविंदा जखमी होत आहेत. आतापर्यंत सुमारे  46 हून अधिक गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यापैकी एक गोविंदा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तिघांना ट्रामा केअरमध्ये हलवण्यात आले आहे. केईएम 3, राजावाडी रुग्णालयात 3, सायन रुग्णालय 2 आणि कंदिवलीत कूपर रुगणालायात एका गोविंदावर उपचार सुरु आहे.

जखमी गोंविंदांची नावे...
- सायन हॉस्पिटलमध्ये सोनू एस (13), रोशन कोलेनूर (12) 
- केईएम हॉ‍स्पिटलमध्ये  सौरभ मयेकर (20), विनित पालेकर (26), सौरव महाडीक (24)
- कांदीवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये लक्ष्मण दुहाडे (43)
-जोगेश्वरी येथील ट्रामा केअरमध्ये निरज अन्सारी (24), आदित्य गावकर (27), सागर भाटकर (22)

दोरीवर अडकलेल्या गोविंदाला खाली अलगद झेलले...
मुंबईतील ताडदेव इथे दहीहंडी फोडल्यानंतर सर्वात वरच्या थरावरील गोविंदा वरच दोरीला अडकून राहिला. त्याचा इतर गोविंदांनी खाली अलगद झेल घेतला.

शिवसाई मंडळाने 9 थर लावून जिंकले 11 लाखांचे बक्षिस
दहीहंडीत आजवर माजगाव ताडवाडी आणि जय जवान या मंडळांचा दबदबा कायम होता. पण यंदा बोरीवलीच्या शिवसाई मंडळाने ठाण्यातील नौपाडामध्ये मनसेच्या दहीहंडीत नऊ थर रचून विक्रम मोडीत काढत तब्बल 11 लाखांचे बक्षीस पटकावले आहे.
चित्तथराराक मानवी मनोरे रचून हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज
मुंबईसह उपनगरात ठिकठिकाणी दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचून हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाले आहेत.
दरम्यान, दहीहंडीवरील बंदी उठवल्यानंतर सर्वत्र गोविंदांचा उत्साह दिसून येत आहे.

महिला गोविंदा पथकाला पहिला मान...
मनसे ठाणे शहर आयोजित दहिहंडीची ढोल ताशा पथकाने सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 49 गोविंदा पथकांची नोंदणी झाली असून त्यात 6 महिला गोविंदा पथकांचा समावेश आहे. पार्ले स्पोर्ट्स महिला गोविंदा पथकला थर लावण्याचा पहिला मान मिळाला मिळाला आहे.

दादरमध्ये आठ थरांची सलामी
दादर, घाटकोपर, जोगेश्वरी, ठाणे अशा अनेक भागात दहीहंडीची तयारी पूर्ण झाली आहे. ठाण्यात 9 थर लावणाऱ्या गोविदांसाठी 11 लाख तर घाटकोपरमध्ये आमदारा राम कदम यांनी 25 लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. आयोजकांकडूनही हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गिअर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

दहिहंडीचे फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...