आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत येणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाने मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील पश्चिमेकडील दुष्काळी भागाला मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजूरी मिळावी यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार २४ जूनच्या पत्राने केंद्रीय पर्यावरण विभागाने या प्रकल्पास पर्यावरणविषयक परवानगी देण्यात आल्याचे कळविले आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाजन यांनी या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता दोन महिन्यात मिळविण्याबाबतचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ समितीच्या ८३ व्या बैठकीमध्ये सादरीकरण करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी महाजन यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेऊन मंजूरी मिळण्याबाबत चर्चा केली होती.

फायदा काय?
या प्रकल्पाअंतर्गत तीन स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी देण्याचे नियोजन आहे. एकूण ४८४५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्याला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. उपसा सिंचन योजना क्र.१ मधून १०.४१ अब्ज घन फूट व योजना क्र.२ मधून ७.५७ अब्ज घन फूट पाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील ८७ हजार १८८ हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...