आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kshitij Thakur And Ram Kade Took Magistrate Custody

क्षितीज ठाकूर, राम कदमांना न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी अर्ज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधिमंडळाच्या लॉबीत पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी मारहाणप्रकरणी निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना शुक्रयवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ठाकूर आणि कदम हे गुरुवारी पोलिसांना शरण आले होते. पोलिसांनी दोघांना अटक करून किला कोर्टात हजर केले होते. तेव्हा त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर दोघांना शुक्रवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंती क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांनी लागेचच जामिनासाठी अर्ज केला आहे.
दुसरीकडे, सचिन सूर्यवंशी यांच्यावर मानसिक आघात झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. सूर्यंवंशी यांच्या शरीरावर मारहाणीनंतर शरीरावर कोणतीही जखम नाही. परंतु अचानक झालेल्या हल्ल्याने सूर्यवंशीच्या मनावर आघात झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.