मुंबई - उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांनी मुंबईतील मलबार हिल या पॉश भागातील प्रसिद्ध जटिया हाऊस हा बंगला तब्बल ४२५ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतला आहे. वैयक्तिक वापरासाठी विकत घेण्यात आलेली ही भारतातील सर्वात मोठी वास्तू आहे. लिलावात उद्योगपती अजय पिरामल यांच्यासह इतर पाच जणांनीही बोली लावली होती. हा लिलाव घडवून आणणाऱ्या जोन्स लँग ला सॅले (जेएलएल) या आंतरराष्ट्रीय कन्सल्टन्सी फर्मने बंगला खरेदीच्या वृत्ताला दुजोर दिला आहे.
पाच बिडर्सला सोडले मागे
सूत्रांनुसार, या बोलीसाठी एकूण सहा बिडर्स होते. त्यामध्ये बिर्ला यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे यामध्ये पिरामल रिएल्टीचे अजय पीरामल हेसुद्धा सहभागी होते. ग्लोबल प्रॉपर्टी कंसल्टेंट जेएलएल इंडिया यांच्याकडून ही डील केली जात आहे. पण, या बाबत ही कंपनी आणि आदित्य बिर्ला ग्रुपचे स्पोकपर्सन यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. सध्या बिर्ला हे कार्मिशेल रोड एनक्लेवमध्ये तीन स्टोरी बिल्डिंगमध्ये आपल्या कुटुंबासह राहत आहेत. बिर्ला हे या जाटिया हाउस प्रॉपर्टीला री-डेव्हलप करणार नसल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्या डील्सला मागे सोडले ?
कुमार मंगलम बिर्ला यांनी जाटिया हाउसचा लिलाव जिंकून मुंबईमध्ये आतापर्यंत झालेल्या मोठ्या डील्सला मागे सोडले आहे. त्यामध्ये पुढील डील्स सहभागी आहेत.
संपत्ती | कुणी विकत घेतली | किंमत |
माहेश्वरी हाउस | सज्जन जिंदल | 400 ( वर्ष 2012 ) |
मेहरानगीर | आदी गोदरेज | 372 |
बिशप गेट | अशोक पीरामल ग्रुपची कंपनी पेनिनसुला लँड | 272 ( वर्ष 2011 ) |
*वरील आकडे कोटीमध्ये आहेत.
असे आहे जाटिया हाउस?
तब्बल 30 हजार स्क्वॉयर फुटमध्ये हा प्रशस्त बंगला आहे. ही जागा एक एकरापेक्षा थोडी कमी आहे. 1950 मध्ये या बंगल्याचे बांधकाम झाले होते. एम. पी. जाटिया ग्रुप ऑफ कंपनीजचे पद्ममजी पल्प आणि पेपर मिल्स लि.चे अरुण ऊर्फ श्याम जाटिया हे या बंगल्याचे मालक आहेत. मागील दोन वर्षांपासून ते या बंगल्याला विकण्याचा प्रयत्न करता आहेत. गत वर्षी प्रॉपर्टी डेवलपरकडून या बंगल्याची विक्री जवळपास झाल्यासारखीच होती. मात्र, रेग्युलेटरी इश्यूजमुळे हा व्यवहार होऊ शकला नाही.
का विकत आहेत बंगला?
मागील चार दशकांपासून जाटिया कुटुंब या बंगल्यामध्ये राहत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या बंगल्याचे ते सध्या योग्यरीत्या व्यवस्थापन करू शकत नाहीत. या कुटुंबातील बहुसंख्य सदस्य मुंबई सोडून आता इतर ठिकाणी राहतात. त्यामुळे मोजकेच सदस्य यात राहतात. त्यांच्यासाठी हा बंगला खूप मोठा आहे. या कुटुंबातील अमित जाटिया यांनी गत वर्षी नेपेन सी रोड असलेली रजाक हॅवेन ही तीन स्टोरी बिल्डिंग 175 कोटी रुपयांना विकत घेतली.
बिर्ला कोणाचे शेजारी होणार ?
जर ही डील पूर्ण झाली तर बाजूच्या मेहरानगीर बंगल्यात राहणा-या गोदरेज कुटुंबाचे शेजार बिर्ला यांना मिळेल. विशेष म्हणजे या बंगल्यामध्ये अॅटॉमिक एनर्जी प्रोग्रामचे जनक होमी भाभा हेही कधी काळी या बंगल्यामध्ये राहिलेले आहेत.
बिर्ला ८.५ अब्ज डॉलर्स संपत्तीचे मालक
बिर्ला कुटुंबाची एकूण संपत्ती ८.५ अब्ज डॉलर्स आहे. सध्या ते दक्षिण मुंबईत टोनी अल्टामाउंट रोडवरील मंगलयान या घरात राहतात. याच भागात मुकेश अंबानी यांचा २७ मजली प्रासाद आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा कसा आहे बंगला....