आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणबी-मराठा एकच आहेत, सिद्धतेसाठी डीएनए चाचणी; मूळ नोंदी सादर करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सरकार दरबारी जरी कुणबी आणि मराठा या वेगवेगळ्या जाती असल्या तरीही वास्तवात मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, या एकमेव मुद्द्यावरच मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईची सगळी भिस्त आहे. त्यामुळे हे सिद्ध करण्यासाठी मानववंशशास्त्राचे पुरावे गोळा केले जात आहेत. कुणबी आणि मराठे यांचे मूळ एकच आहे हे दाखवून देण्यासाठी डीएनए चाचणीचा मार्गही अवलंबण्याचा विचार सरकारने नेमलेल्या समिती करत अाहे.

पूर्वीच्या काळी मराठा म्हणवून घेणे ही सामाजिक प्रतिष्ठेची बाब असे, त्यामुळे अनेकांनी स्वजातीची नोंद कुणबीऐवजी मराठा अशी केली. त्या काळी शेती करणारे कुणबी मानले जात, मात्र कुणब्यांमधील ज्यांनी शिवकाळात सैन्यात शिपाईगिरी केली त्यांची सरकारदरबारी मराठा अशी नोंद झाली. मराठे वर्षातून आठ ते दहा महिने मुलुखगिरीवर असल्याने त्यांना शेती करणे शक्य नव्हते. कायमच्या फिरतीमुळे शिक्षण नसल्याने मागासलेपणात भर पडली. म्हणूनच याबाबतच्या ऐतिहासिक दाखल्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती राज्य सरकारच्या मराठा आरक्षण समितीच्या एका सदस्याने दिली. इतिहासकाळात मराठी भाषक सैनिकांना जरी ते इतर जातींचे असले तरीही सरसकट मराठे असेच म्हटले जायचे. त्यामुळे मराठा ही जात नसून तो एक समूह आहे, अशी मांडणी न्यायालयीन लाढाईत केली जाणार आहे. अशीच मांडणी इरावती कर्वे, काशीराव देशमुख, भगवंतराव पारेख, राणा चव्हाण आणि विठ्ठल रामजी शिंदे यांनी केल्याची पुस्तीही या सदस्याने जोडली.

मंडल आयोगाचा अडथळा : ऐतिहासिकदस्तऐवजांच्या अाधारे कुणबी-मराठा हे एकच असल्याचे सिद्ध करण्याची तयारी सुरू असली तरी यात अडथळे आहेत. मुख्य अडथळा, मंडल आयोगाने मराठ्यांचा समावेश क्षत्रियांमध्ये केला आहे. त्याआधारे क्षत्रियांना मागासवर्गीय ठरवता येणे अशक्य आहे. जुन्या जनगणनांमध्ये कुणबी मराठा नोंदी वेगळ्या आहेत. २००३ मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जगन्नाथ होले विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार, २००० च्या सुहास दशरथे विरुद्ध राज्य सरकार खटल्यात मराठा - कुणबी एकच आहेत हे मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नव्याने पुराव्यांच्या मांडणीचे आव्हान राज्य सरकारसमोर असेल.
गृहीत काला छेद देण्याचे नियोजन
मराठे हे कायम संस्थानिक, राजेपदी असत. त्यामुळे संस्थानिकांची जात सामाजिक मागास कशी राहील, या युक्तिवादाला छेद देण्याचेही नियोजन आहे. त्यासाठी इतर जातींमधील राजे, संस्थानिकांची उदाहरणे दिली जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील राजेपदावर असलेले मुकणे घराणे हे कोळी समाजाचे आहे, तर गोंडवाना संस्थानाचे अत्राम घराणे हे आदिवासी आहेत. त्यामुळे पूर्वीचे सर्व संस्थानिक हे सरसकट मराठेच होते, असे म्हणता येणार नाही.

दावा सिद्ध करण्यात न्यायालयीन अडचण
>मराठा-कुणबीएकच आहेत असे दावे करणारे अनेक पुरावे यापूर्वीही अनेक प्रकरणांत विविध न्यायालयांसमोर सादर झाले आहेत. मात्र एकाही प्रकरणात या दोन्ही जाती एकच आहेत, असे कुठल्याही न्यायालयाने अजूनपर्यंत तरी मान्य केलेले नाही. तसेच याअगोदर अनेक न्यायालयीन खटल्यांमध्ये काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी मराठ्यांनी आपण क्षत्रिय आहोत, असे निकाल मिळवले आहेत. ही बाबही कुणबी आणि मराठे एकच जात आहे, या दाव्याच्या विरोधात जाणारी आहे.
- रावसाहेब कसबे, माजीसदस्य, राज्य मागासवर्ग आयोग

पुढील स्लाइडवर वाचा, आतापर्यंत ७२ ऐतिहासिक पुरावे सरकारच्या हाती

बातम्या आणखी आहेत...